शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक चुटेले यांनी १५ हजार न दिल्याने खोटी तक्रार केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:00 IST

प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपाचे नगरसेवक विजय चुटेले यांनी जनसंपर्क कार्यालय चालविण्यासाठी दरमहा १५ हजार अथवा कार्यालयासाठी एक सफाई कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगितले होते. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप आरोग्य विभागातील मालवाहक जमादार संजय लुडेरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देनागपूर मनपा आरोग्य विभागातील जमादाराचा आरोप : महापौर, आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रभाग क्रमांक १७ मधील भाजपाचे नगरसेवक विजय चुटेले यांनी जनसंपर्क कार्यालय चालविण्यासाठी दरमहा १५ हजार अथवा कार्यालयासाठी एक सफाई कर्मचारी उपलब्ध करण्यास सांगितले होते. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी विरोधात खोटी तक्रार केल्याचा आरोप आरोग्य विभागातील मालवाहक जमादार संजय लुडेरकर यांनी केला आहे. यासंदर्भात महापौर, सत्तापक्षनेते व आयुक्त यांना निवेदन दिले असून चुटेले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लुडेरकर यांनी केली आहे.धंतोली झोनचे सहायक अभियंता श्याम धरममाळी आणि सफाई कर्मचारी संजय लुडेरकर यांनी आपल्या नावावर एका कार शोरूमच्या संचालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार नगरसेवक विजय चुटेले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. याची दखल घेत श्याम धरममाळी यांची सोमवारी तडकाफडकी आसीनगरला बदली करण्यात आली आहे़ परंतु कर्मचाºयाने चुटेले यांच्यावरही पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे.प्रभागात चुटेले यांची तीन जनसंपर्क कार्यालये आहेत. कार्यालयाचा महिन्याचा खर्च १५ हजारांच्या आसपास आहे. कार्यालयाचा खर्च म्हणून महिन्याला १५ हजार रुपयांची मागणी चुटेले यांनी केली होती. त्यांची ही मागणी पूर्ण न केल्याने माझ्यावर चुकीचे आरोप करून माझ्या विरोधात महापालिका प्रशासनाकडे खोटी केली. या प्रकरणाची चौकशी करून चुटेले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लुडेरकर यांनी केली आहे.भाजपा नगरसेविकेच्या पतीकडून सफाई कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी केल्याचे प्रकरण गाजत असतानाच चुटेले यांच्याविरोधात जमादाराने तक्रार केल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिकेतील भाजपाचे पदाधिकारी यासंदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार