शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरणातील २५०० लोकांची मनपा घेतेय काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 20:56 IST

शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्­हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सेवाकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते. शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्­हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे. येथील लोकांच्या आरोग्यासह त्यांची भोजन, निवास व्यवस्था व सुरक्षेबाबत मनपाद्वारे काळजी घेण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर या तीन ठिकाणी सुमारे १५०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये ४५० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय चमू आणि इतर टीम सेवा देत आहेत. क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांशी मुस्लिम बांधव आहेत. त्यांच्यासाठी रमजानच्या पर्वावर दररोज शहरी आणि इफ्तारीचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहेपाचपावली क्षेत्रामध्ये पोलिस क्वॉर्टरमध्ये सुमारे ५५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलिस क्वॉर्टरमध्ये एकूण ७ विंग असून यातील प्रत्येक विंगमध्ये २७ फ्लॅट आहेत. यापैकी एक विंग वैद्यकीय चमूसाठी निर्धारित करण्यात आली आहे. या विंगमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, परिचारिका यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहेव्हीएनआयटीच्या चार वसतिगृहामध्ये सुमारे ६०० संशयितांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना दोन वेळचे भाजी, पोळी, वरण, भात असे जेवण, चहा, नाश्ता ही सर्व व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत आहे. विलगीकरण कक्षातील नागरिकांवर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार करण्यात येत आहे.विलगीकरणातील लोकांचे कोरोना स्वॅब घेण्यात येते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार केले जातात. तर अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा १४व्या दिवशी स्वॅब घेण्यात येतो. तो अहवालसुद्धा निगेटिव्ह आल्यास रुग्णाला सुटी देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र येथील काही लोकांची सुविधा नसल्याची तक्रार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका