शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या 'दुसऱ्या उत्पन्नाची' महामंडळाकडे माहितीच नाही; RTI मधून उघड

By नरेश डोंगरे | Updated: April 18, 2024 18:19 IST

प्रवासी वाहतूक करविणारी एसटी बस असो, रेल्वे असो की विमान. प्रवाशांकडून तिकिट भाडे घेण्यासोबतच त्यांचे लगेज (सामान) वाहतूकीतूनही उत्पन्न मिळवत असते.

नागपूर : प्रवासी भाड्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणकोणत्या मार्गाने एसटीला उत्पन्न मिळते, त्याची महामंडळाला माहितीच नसल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. महामंडळाच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी तसे लेखी उत्तरातून कळविले आहे.

प्रवासी वाहतूक करविणारी एसटी बस असो, रेल्वे असो की विमान. प्रवाशांकडून तिकिट भाडे घेण्यासोबतच त्यांचे लगेज (सामान) वाहतूकीतूनही उत्पन्न मिळवत असते. विमानतळावर पार्किंग, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स (शॉप), रेस्टॉरेंट, तसेच जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना मोठा महसूल मिळतो. हवाई कंपन्यांची उत्पन्नांची बातच न्यारी आहे. तर, रेल्वेकडून उत्पन्नाचे वेगवेगळे स्त्रोत निर्माण करण्यावर अलिकडे मोठा भर देण्यात येत आहे. प्रवासी, मालवाहतूक तर शेकडो कोटी देणारी आहेच, भंगार विकून त्यातूनही कोट्यवधी रुपये गोळा करण्याचा सपाटा रेल्वेने लावला आहे.

दुसरीकडे एसटीकडे प्रवासी भाड्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे दुसरे कोणते स्त्रोत आहेत आणि त्यातून किती उत्पन्न मिळवले जाते, त्याची माहितीच अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येते. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर एसटी महामंडळाने कोणत्या बाबीतून किती उत्पन्न मिळवले, त्याची माहिती नसल्याचे लेखी उत्तर महामंडळाच्या जन माहिती आणि सांख्यिकी अधिकाऱ्यानी दिली आहे.

माहित नाही की, माहिती बाहेर येऊ द्यायची नाही ?विशेष म्हणजे, एसटी महामंडळाला प्रवासी भाड्यासोबतच मालवाहतूकीतून हमखास उत्पन्न मिळते. लग्नसारखे प्रासंगिक करार त्यातून उत्पन्न मिळते. जिल्हा आणि तालुका मुख्यालयाच्या स्थानकावर रेस्टॉरेंट असते. काही ठिकाणी विविध वस्तू विक्रीचे शॉपही असतात. रसवंती असते. पार्किंग असते. या ठिकाणी विविध कंपन्या आणि व्यापारी प्रतिष्ठानांची जाहिरात करणारे मोठमोठे साईन बोर्ड असतात, त्यातूनही मोठे उत्पन्न मिळते. असे असताना जन माहिती अधिकाऱ्यांना या उत्पन्नांच्या स्त्रोतांची आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती नसण्याची बाब संशयास्पद आहे. अधिकाऱ्यांना खरेच ते माहित नाही की ही माहिती बाहेर येऊ द्यायची नाही, असा प्रश्न यामुळे चर्चेला आला आहे.