शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडे चेंबर दुरुस्तीसाठी पैसा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:08 IST

नागरिक त्रस्त : पाॅप्युलर सोसायटी परिसरातील तक्रारीची प्रशासनाकडून दखल नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती ...

नागरिक त्रस्त : पाॅप्युलर सोसायटी परिसरातील तक्रारीची प्रशासनाकडून दखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असली तरी चेंबर दुरुस्तीसाठी एक-दोन लाख रुपये नाही इतकी वाईट स्थिती नक्कीच नाही. परंतु तिजोरीत पैसा नसल्याचे कारण पुढे करून नागरिकांच्या तक्रारींची प्रशासन व नगरसेवकांकडून दखलच घेतली जात नाही. अशा परिस्थितीत दुर्गंधीचा त्रास आणखी किती दिवस सहन करावा, असा प्रश्न प्रभाग ३५ मधील मनीषनगर भागातील अथर्व ग्लाेरी, पाॅप्युलर सोसायटी परिसरातील नागरिकांना पडला आहे.

चार महिन्यांपूर्वी अथर्व ग्लोरीच्या बाजूला असलेल्या ट्रान्सफार्मरजवळील चेंबर फुटले. मनपाचे कर्मचारी येतील दुरुस्ती करतील अशी आशा परिसरातील नागरिकांना होती. परंतु महिना-दोन महिने प्रतीक्षा केल्यानंतरही प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली नाही. अखेर नागरिकांनी धंतोली झोन, मनपा मुख्यालय व आयुक्तांकडे फुटलेल्या चेंबरची तक्रार केली. पण महिना झाला तरी दखल नाही. चेंबर फुटल्याने बाजूच्या मोकळ्या प्लाॅटवर दूषित पाणी साचले आहे. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. तसेच घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अत्यावश्यक कामासंदर्भात तक्रार करूनही प्रशासन व नगरसेकांकडून दखल घेतली जात नसेल तर नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या कुणाकडे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

....

नागरिकांनी कर का भरावा?

वस्त्यातील गडर लाइन, चेंबर दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, पथदिवे, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे;मात्र तक्रार करूनही चेंबर दुरुस्ती होत नसेल तर नागरिकांनी महापालिकेचा कर का भरावा, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

....

निधी नसल्याने मंजुरी थांबली होती

आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने गेल्या वर्षभरात प्रभागातील कोणत्याही स्वरुपातील विकासकामे झालेली नाही. नागरिक तक्रार करतात; पण फाइल मंजूर होत नसल्याने आमचाही नाइलाज आहे. चेंबर दुरुस्तीची फाइल मंजूर झाली आहे. काही दिवसांत कामाला सुरुवात होईल.्र

जयश्री वाडीभस्मे, नगरसेविका