शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूर जिल्ह्यात काटोलमध्ये नगरसेवकास इराणी गुंडांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 10:47 IST

उघड्यावर शौच करणाऱ्या इराणी गुंडास टोकल्याने त्याने त्याच्या साथीदारांसह विद्यमान नगरसेवक व त्यांच्या मित्रास मारहाण केली.

ठळक मुद्देउघड्यावर शौच करण्यास टोकल्याने वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उघड्यावर शौच करणाऱ्या इराणी गुंडास टोकल्याने त्याने त्याच्या साथीदारांसह विद्यमान नगरसेवक व त्यांच्या मित्रास मारहाण केली. त्याने फायटरने वार केल्याने नगरसेवक जखमी झाला, शिवाय त्याने नगरसेवकाला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्या गुंडास अटक करण्यात आली आहे. ही घटना काटोल शहरात शनिवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.जखमींमध्ये नगरसेवक किशोर गाढवे (४१) व त्यांचा मित्र उमेश चिंतामण डाखोळे (३२) दोघेही रा. काटोल यांचा समावेश असून, हैदर अक्रम अली (२३), दानिश रहीम शेख (२१) व शब्बीर अली अक्रम अली (२०) तिघेही रा. काटोल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी इराणी गुंडांची नावे आहेत. किशोर गाढवे हे सत्ताधारी विदर्भ माझा पक्षाचे नगरसेवक असून, ते व त्यांचा मित्र उमेश डाखोळे शनिवारी रात्री हनुमान तलाव परिसरात फिरत होते. त्यातच हैदर अक्रम अली हा तलावाच्या पायरीवर शौचास बसला. त्यामुळे किशोर गाढवे यांनी त्याला टोकले.त्यावर चिडलेल्या हैदर अक्रम अलीने गाढवे यांना शिवीगाळ करीत त्याच्या साथीदाराला बोलावले आणि गाढवे व डाखोळे यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्याने दोघांवर फायटरने वार केल्याने दोघेही जखमी झाले. त्यानंतर गाढवे यांनी रात्री पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि ३२४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.दरम्यान, रविवारी सकाळी या घटनेची माहिती शहरात पसरली. त्यामुळे पालिकेतील गटनेता चरणसिंग ठाकूर, पालिकेचे उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, विरोधी पक्षनेता संदीप वंजारी, नगरसेवक तानाजी थोटे, सुकुमार घोडे, राजू चरडे, माजी उपाध्यक्ष समीर उमप, दिगांबर डोंगरे, प्रहारचे दिनेश निंबाळकर, आशिष जयस्वाल, पिंटू देशमुख, विजय ताटे, सूरज लोही यांच्यासह नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. त्यामुळे ठाण्याच्या आवारात तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तिन्ही आरोपींना काटोल येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crimeगुन्हा