शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Vidarbha : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १४६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 23:28 IST

विदर्भातील रुग्णांची संख्या १४६ वर पोहोचली आहे. एम्सने तपासलेल्या नमुन्यात यवतमाळ जिल्ह्यातील १० तर अमरावती जिल्ह्याचा १ नमुना निगेटिव्ह आला आहे. 

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील १० तर अमरावतीमधील एक नमुना निगेटिव्ह

लकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणू लागण झालेल्या रुग्णांची संख्या नागपुरात १०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. नागपुरात मंगळवारी सहा महिलेसह दोन पुरुष असे आठ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९० वर पोहोचली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये आतापर्यंत सर्वात ज्येष्ठ ७० वर्षीय रुग्णासह एक गर्भवती, दोन व तीन वर्षाच्या चिमुकल्याची नोंद झाली. या रुग्णासह विदर्भातील रुग्णांची संख्या १४६ वर पोहोचली आहे. एम्सने तपासलेल्या नमुन्यात यवतमाळ जिल्ह्यातील १० तर अमरावती जिल्ह्याचा १ नमुना निगेटिव्ह आला आहे. ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकाकडून नागपूरच्या सतरंजीपुऱ्यातील मृत व त्याच्या नातेवाईंकाकडून इतरांना लागण झालेले रुग्ण मंगळवारीही आढळून आले. या आठ रुग्णामधून सहा रुग्ण सतरंजीपुऱ्यातील तर दोन रुग्ण मोमीनपुऱ्यातील आहेत. सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे. आणखी १३५ संशयितांच्या नमुन्यांचा तपासणीचा अहवाल प्रलंबित आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे सर्व नमुने तातडीने तपासणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. मेयोच्या प्रयोगशाळेतून आज सात पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये दोन वर्षीय मुलगा, तीन वर्षीय मुलगी व ३१ वर्षीय त्याची आई आहे. सतरंजीपुरात राहणाऱ्या या कुटुंबाला २० एप्रिल रोजी वनामती येथे क्वारंटाइन केले होते. या शिवाय, ७० वर्षीय वृद्ध पुरुष, ६५ वर्षीय महिला हे मोमीनपुऱ्यातील रहिवासी आहे. २० वर्षीय गर्भवती व १७ वर्षीय युवती सतरंजीपुऱ्यातील रहिवासी आहे. एम्स प्रयोगशाळेत ६० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. या सुद्धा सतरंजीपुऱ्यातील असून ८ एप्रिलपासून लोणारा येथे क्वारंटाइन आहेत. यांचा दुसरा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले आहे. एम्सने सायंकाळी एकूण २१ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील १९, अमरावती व चंद्रपूर जिल्ह्याचा एका नमुन्याचा समावेश होता. यातील यवतमाळ जिल्ह्यातील १० व अमरावतीमधील एक नमुना निगेटिव्ह आला आहे. उर्र्वरित १० नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविले आहेत.