शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कोरोनावरील लसीसाठी करावी लागणार १२ ते १५ महिन्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 10:17 IST

कोरोनावरील लसीसाठी किमान १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.

ठळक मुद्देनागपुरात प्रतिबंधात्मक लसीसाठी मानवी चाचणीला मंजुरीअशोक अरबट यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा मानवी चाचणीसाठी नागपूरसह देशाच्य १२ सेंटरला परवानगी मिळाली आहे. ‘आयसीएमआर’च्या व्हायरल झालेल्या पत्रानुसार १५ ऑगस्टपूर्वी ही लस तयार करण्याची सूचना आहे. मात्र, सध्या ज्या स्तरावर लसीचे कार्य सुरू आहे त्यानुसार किमान १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी दिली.जगभरात कोरोनावरील लसनिर्मितीच्या अनुषंगाने डॉ. अरबट यांनी सुरू असलेल्या प्रयोगांचा आढावा घेतला. ते म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेनुसार सध्या कोरोनाची लसनिर्मितीसाठीचे १३ प्रयोग मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. मॉडर्न इनकॉर्पोरेशन (दुसरा टप्पा), चीनची सिनोवॅक बायोटेक (दुसरा टप्पा), यूकेची ऑक्सफोर्ड झेनेका (दुसरा/तिसरा टप्पा), फायजर बेनटेक (दुसरा टप्पा) आणि अन्य काही लसनिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. कोरोना लसनिर्मितीचे हे १३ प्रयोग जर यशस्वी ठरले त्यांना नोव्हेंबर २०२० पर्यंत मान्यता मिळू शकते. मात्र, मोठ्याा प्रमाणात लसनिर्मिती आणि सामान्य लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी त्याची पुरवठा साखळी (सप्लाय चेन) तयार करण्याचा वेळ बघता, पुढील वर्षीच ही लस बाजारात येऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटनेची सॉलिडेरिटी ट्रायल, यूकेची रिकव्हरी ट्रायल आणि अमेरिकेची ऑपरेशन वार्प स्पीड या अग्रगण्य चाचण्या आहेत.

‘आयसीएमआर’च्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल यांच्या विद्यमाने कोरोनावरील प्रतिबंधात्मक ‘कोव्हॅक्सिन’ तयार करण्यात येत आहे. ही इनअ‍ॅक्टिव्हेटेड (निष्क्रिय) विषाणू प्रकाराची लस आहे. कोविड १९ विषाणूच्या व्हायरसच्या मृत पेशींपासून तयार करण्यात येत आहे. सेंट्रल ड्रग स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने लसीच्या मानवी चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आहे. त्यावरून असे सांगता येईल की, १५ ऑगस्ट २०२० पर्यंत लस सामान्य व्यक्तींसाठी वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या संशोधनानंतर उपलब्ध करून देणे शक्य नाही.लसनिर्मिती चाचणीचे विविध टप्पे प्राण्यांवर चाचणी

लसीच्या उपयुक्ततेची आणि परिणामांची चाचणी उंदीर आणि माकड या प्राण्यांवर करण्यात येते. पहिला टप्पा : २० ते ८० मनुष्यांवर चाचणी करून लसीची सुरक्षा आणि प्रतिकारकशक्ती बघण्यात येते. दुसरा टप्पा : माणसाच्या मोठ्या चमूवर वयोगटानुसार चाचणी सुरक्षा, लसीची मात्रा आणि त्याला कशाप्रकारे द्यायचे याचे मूल्यांकन करणे. तिसरा टप्पा : दुसºया टप्प्यात दुष्परिणाम नसेल तर हजारोंच्या संख्येत मानवी चाचणी करतात. एका गटाला प्रत्यक्ष लस तर दुसºया गटाला प्लासेबो देऊन तुलनात्मक अभ्यास करतात. लसीला मान्यता : तिसºया टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली की लसीचे नियमन करणाºया शासकीय संस्थेची मान्यता मिळविणे. त्यानंतर त्याचे वितरण व सामान्य लोकांसाठी उपलब्ध केली जाते.

 

टॅग्स :Healthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या