शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

Coronavirus: धक्कादायक! दुबईतून आलेल्या प्रवाशांची तपासणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:08 IST

जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव उपराजधानीतदेखील झाला असून संपूर्ण यंत्रणा ‘मिशन मोड’वर गेली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे आवश्यक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देयंत्रणा ‘मिशन मोड’वर असताना विमानतळावर हलगर्जीपणा : कोरोनाचा शिरकाव रोखणार कसा?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव उपराजधानीतदेखील झाला असून संपूर्ण यंत्रणा ‘मिशन मोड’वर गेली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे आवश्यक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईहून आलेल्या काही प्रवाशांची मुंबई विमानतळावर जुजबी तपासणी झाली परंतु नागपूर विमानतळावर तर त्यांना साधी विचारणादेखील झाली नाही. खुद्द प्रवाशांनादेखील ही बाब खटकली व सामाजिक भान जपत त्यांनी स्वत: आरोग्य यंत्रणेशी संपर्क केला.नागपुरातील काही प्रवासी दुबई येथे फिरायला गेले होते. यात ‘लोकमत’चे वाचक असलेल्या एका व्यक्तीचादेखील समावेश होता. मुंबईहून शारजा विमानतळावर पोहोचल्यावर त्यांची कुठलीही तपासणी झाली नाही. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ‘मास्क’ व ‘सॅनिटायझर’चा उपयोग केला. दोन दिवसांअगोदर हे सर्व लोक मुंबईमागे नागपुरात परतले. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रामुख्याने सिंगापूर, इटली, हॉंगकॉंग, चीन इत्यादी देशांतून येणाऱ्या प्रवाशांचीच सखोल तपासणी होत होती. संयुक्त अरब आमिरातीहून आलेल्या प्रवाशांची जुजबी तपासणी झाली.त्यानंतर पुढील विमान पकडून हे सर्व जण नागपूरकडे निघाले. नागपूर विमानतळावर त्यांना साधी विचारणादेखील झाली नाही. आम्ही नागपूर विमानतळावर उतरल्यावर वैद्यकीय तज्ज्ञांचे ‘युनिट’ आम्हाला तपासायलादेखील आले नाही. आम्ही सर्व जण दुबईहून आलो होतो. त्यामुळे तपासणी होईल असे वाटले होते. परंतु असे काहीही झाले नाही, असे संबंधित व्यक्तीने कुठलीही ओळख न छापण्याच्या अटीवर सांगितले.आरोग्य यंत्रणेशी स्वत:च केला संपर्कपुणे येथे दुबईहून आलेल्या प्रवाशांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे समोर आल्याने आम्हीदेखील हादरलो होतो. नागपूर विमानतळावर आमची सखोल तपासणी न झाल्याने आम्ही स्वत:च आरोग्य यंत्रणेशी संपर्क केला. मात्र जर तुमच्यात काही लक्षणे आढळत असतील तरच नमुने द्यायला या, असे सांगण्यात आले. पुढील सात दिवस कुणाशीही संपर्क न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या कालावधीत ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्वरित संपर्क करण्यास सांगण्यात आले असल्याचे संबंधित व्यक्तीने ‘लोकमत’ला सांगितले.‘डोमेस्टिक’ प्रवाशांची तपासणी का नाही?नागपूर विमानतळावर केवळ आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाºया प्रवाशांची तपासणी होत आहे. परदेशातून येणारे नागपुरातील प्रवासी अगोदर मुंबई किंवा दिल्ली येथे उतरतात व तेथून विमानाने नागपुरात येतात. एखाद्या प्रवासी मुंबई, दिल्ली विमानतळावर ‘कोरोना’ बाधित व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाची नागपूर विमानतळावर सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. प्रवासी तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर