शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

CoronaVirus : नागपूरचे  हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली यांना न्यूयॉर्कमध्ये कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 22:53 IST

संत्रानगरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली यांना न्यूयॉर्क येथे कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रकृती चांगली असल्याची व स्वत:ला इतरांपासून २१ दिवसासाठी वेगळे ठेवल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देप्रकृती चांगली असल्याची दिली माहिती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संत्रानगरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक प्रिन्स तुली यांना न्यूयॉर्क येथे कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्रकृती चांगली असल्याची व स्वत:ला इतरांपासून २१ दिवसासाठी वेगळे ठेवल्याची माहिती दिली. प्रिन्स तुली हे प्रसिद्ध व्यावसायिक मोहब्बतसिंग तुली यांचे भाचे आहेत.अमेरिका येथे परिस्थिती आटोक्यात आहे. नागरिक सरकारला पूर्णपणे सहकार्य करीत आहेत. ते लॉकडाऊनचे व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत आहेत. तसेच, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना नियंत्रणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची अमेरिकेत प्रशंसा केली जात आहे असे तुली यांनी सांगितले.अमेरिकेतील नागरिक सोशल मीडियावरील पोस्टस्ला महत्त्व देत नाहीत. ते केवळ सरकार व स्थानिक प्रशासनाच्या माहितीवर विश्वास ठेवतात. ते सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे प्रामाणिकपणे पालन करीत आहेत. अमेरिकेतील भारतीयांना त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांची चिंता आहे. ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत असतील व स्वत:ची काळजी घेत असतील असे त्यांना वाटत आहे. अमेरिकेतील रस्त्यांवर आर्मी तैनात करण्यात आली आहे. रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरली आहेत. तुलनेने भारतात तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो असे तुली म्हणाले.अमेरिकेतील शाळा ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. अमेरिकेतील डॉक्टरांनी या संकटातून लवकरच बाहेर पडण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तात्काळ वेगळे केले जात आहे. भारतात पंतप्रधानांनी लक्ष्मण रेषा आखली आहे. भारतीयांनी त्याचे पालन केले पाहिजे. अमेरिकेत वृत्तपत्रे सॅनिटाईज केली जातात. त्यामुळे वृत्तपत्रांबाबत नागरिकांना भीती वाटत नाही. ते नियमित वृत्तपत्रे वाचत आहेत. कोरोनाबाधितांना विलग केले जात असल्याने सर्वांमध्ये सुरक्षेची भावना आहे. व्हॉटस्अ‍ॅपवर अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये. अमेरिकेतील हॉटेल बंद केली आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहे. त्यांची उपासमार होऊ देणार नाही, असे तुली यांनी सांगितले.पैशांपेक्षा जीव महत्त्वाचा आहे. भारतात गरजूंना अन्नधान्य वितरित केले जात आहे. हे चित्र पाहून मन भरून येते. भारतीयांनी कोरोनाला घाबरू नये. परिस्थितीत सुधारणा होतपर्यंत घरीच रहावे. कोरोनासंदर्भात अफवा पसरविणे थांबवावे. सरकारी आदेशांचे पालन करावे, असे आवाहन तुली यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या