शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : चिंताजनक, बाधितांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 19:53 IST

CoronaVirus दोन दिवस बाधितांपेक्षा बरे झालेल्या संख्या जास्त असल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. मात्र बुधवारच्या अहवालात बाधितांची संख्या वाढलेली दिसून आली. २४ तासात जिल्ह्यामध्ये ८५ मृत्यूंची नोंद झाली तर साडेसात हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले सद्यस्थितीत जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण असून गुरुवारी एकूण पॉझिटिव्हची संख्या चार लाखांपार जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे२४ तासात ८५ मृत्यू, ग्रामीणमध्ये जास्त मृत्यू : साडेसात हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन दिवस बाधितांपेक्षा बरे झालेल्या संख्या जास्त असल्यामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला होता. मात्र बुधवारच्या अहवालात बाधितांची संख्या वाढलेली दिसून आली. २४ तासात जिल्ह्यामध्ये ८५ मृत्यूंची नोंद झाली तर साडेसात हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले सद्यस्थितीत जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण असून गुरुवारी एकूण पॉझिटिव्हची संख्या चार लाखांपार जाण्याची शक्यता आहे.

बुधवारी जिल्ह्यामध्ये ७ हजार ५०३ बाधित आढळले. यातील ४ हजार ८०३ शहरातील तर २ हजार ६९० ग्रामीण भागातील होते. शहरात ३७, ग्रामीणमध्ये ३८ तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात एकूण २६ हजार ५२५ चाचण्या झाल्या. यातील १९ हजार २४२ शहरात तर ७ हजार २८३ ग्रामीण भागात झाल्या. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७७ हजार १८७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यात शहरातील ४६ हजार ३५३ तर ग्रामीणमधील ३० हजार ८३४ रुग्णांचा समावेश आहे. सक्रिय रुग्णांपैकी ६० हजार ६६० जण होम आयसोलेशनमध्ये असून १६ हजार ५२७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

एकूण पॉझिटिव्ह चार लाखांजवळ

आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ३ लाख ९३ हजार ८३० बाधित आढळून आले. तर ७ हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात ४ हजार ३९२ तर ग्रामीणमध्ये १ हजार ७८१ रुग्णांचा मृत्यू झाला. १ हजार ३८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते.

सुमारे सात हजार कोरोनामुक्त

बुधवारी जिल्ह्यातील ६ हजार ९३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील ४ हजार ५८५ रुग्ण शहरातील तर २ हजार ३५० ग्रामीण भागातील आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर