शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोघांचा मृत्यू, १३ पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५१४ , मृत्यूसंख्या ११

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:24 IST

शहरातील नव्या वसाहतींसोबतच आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. यात शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यूची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे. आज १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात दोन एसआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.

ठळक मुद्देएसआरपीएफचे दोन जवान पॉझिटिव्ह, मन्नाथखेडी, गुमगाव येथे कोरोनाचे रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नव्या वसाहतींसोबतच आता ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढत आहे. यात शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यूची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे. आज १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात दोन एसआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्रथमच गुमगाव (ता. हिंगणा) व मन्नाथखेडी (ता. नरखेड) या गावात कोरोनाची नोंद झाली, तर भानखेडा वसाहतीमधून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. नागपुरात रुग्णांची संख्या ५१४ झाली आहे. पाच दिवसांपूर्वी सीए रोडवरील एका ४३ वर्षीय भिकाऱ्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने पोलिसांनी त्याला मेयोत दाखल केले. त्याचे नमुने तपासले असता तो पॉझिटिव्ह आला. उपचार सुरू असताना आज सकाळी मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापासून तो व्हेंटिलेटरवर होता. याला न्यूमोनिया सोबतच यकृताचा गंभीर आजार होता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरा मृत टेकचंदनगर, हिंगणा येथील ७३ वर्षीय आहे. या रुग्णाला मेंदूज्वर झाल्याने धंतोली येथील एका खासगी इस्पितळात भरती करण्यात आले होते. शुक्रवारी अहवाल पॉझिटिव्ह येताच मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाची सुरुवातीपासून प्रकृती गंभीर होती. या रुग्णाला मधुमेह, उच्चरक्तदाबासह इतरही आजार होते. सायंकाळी ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात दोन तर मे महिन्यात नऊ मृतांची नोंद झाली आहे.मन्नाथखेडीत दोन तर गुमगावमध्ये एक रुग्णकोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सुरुवातीला कामठी व कन्हान पुरतेच मर्यादित होते. परंतु नंतर मुंबई व पुण्यावरून येणाऱ्यांची संख्या वाढताच ग्रामीणच्या इतरही भागात रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. आज नरखेड तालुक्यातील मन्नाथखेडी येथे ३५ वर्षीय दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. २७ मे रोजी हे दोन्ही रुग्ण मुंबईहून बसने प्रवास करीत गावात पोहचले. त्यांच्यासोबत आणखी सात जण होते. येथे त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. गुरुवारी या नऊही जणांची चाचणी करण्यात आली. यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह तर इतरांचा अहवाल निगेटिव्ह आला. यांना मेयोमध्ये दाखल करण्यात आले. हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथेही एक रुग्ण पॉझिटिव्ह आला.भानखेड्यातील सहा रुग्ण पॉझिटिव्हमेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या एका एसआरपीएफच्या जवानाची तहसील पोलीस क ॅम्पमधून मोमीनपुरा येथे ड्युटी लावण्यात आली होती. शिबिरामध्ये नमुने तपासले असता अहवाल पॉझिटिव्ह आला. ‘एम्स’च्या प्रयोगशाळेतही एसआरपीएफचा एक जवान पॉझिटिव्ह आला. या शिवाय, सतरंजीपुरा, तांडापेठ येथून एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. नीरीच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात भानखेडा येथील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले.पाच रुग्ण कोरोनामुक्तमेयो, मेडिकल व एम्समधून पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. यात मेयो येथे उपचार घेत असलेल्या मोमीनपुरा येथील एक महिला रुग्ण, एम्समध्ये उपचार घेत असलेला बुटीबोरी येथील २७ वर्षीय रुग्ण तर मेडिकलमधून गड्डीगोदाम येथून तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १९७दैनिक तपासणी नमुने ४८२दैनिक निगेटिव्ह नमुने ४६९नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५१४नागपुरातील मृत्यू ११डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३७५डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २६५२क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १८८९पीडित-५१४-दुरुस्त-३७५-मृत्यू-११

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू