शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात प्रशासनाचा आपसात ताळमेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:03 IST

संपूर्ण जग आणि देश कोरोना विषाणूरूपी संकटाशी लढत आहे. नागपुरात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू आहे. नागपूर हे रेड झोनमध्ये आहे. दिवसेंदिवस परिस्थिती नाजूक होत चालली आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने मिळून काम करणे आवश्यक असते, परंतु नागपुरात तरी असे चित्र दिसून येत नाही.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जग आणि देश कोरोना विषाणूरूपी संकटाशी लढत आहे. नागपुरात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू आहे. नागपूर हे रेड झोनमध्ये आहे. दिवसेंदिवस परिस्थिती नाजूक होत चालली आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने मिळून काम करणे आवश्यक असते, परंतु नागपुरात तरी असे चित्र दिसून येत नाही. शासनाचे आदेश नागपूर शहर व ग्रामीण भागासाठी वेगवेगळे व वेगवेगळ्या दिवशी जाहीर केले जातात. परिणामी अंमलबजावणीऐवजी संभ्रम निर्माण होतो.केंद्र व राज्य सरकारने ३ मेनंतर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही प्रमाणात शहरांमध्ये सवलत देण्याचाही निर्णय घेतला. साहजिकच हा निर्णय सर्वच जिल्ह्यांसाठी होता. यात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल केले होते. नागपूरचाच विचार केला तर हेच आदेश नागपूर शहरासाठी मनपा आयुक्तांनी आधीच जारी करून टाकले. त्यामुळे ग्रामीण भागाचे काय? असा संभ्रम निर्माण झाला. जिल्हाधिकाऱ्यांना दुसºया दिवशी तेच आदेश पुन्हा जारी करावे लागले. शहराचाच विचार केला तर कोरोनामुक्त असलेल्या सहा झोनमध्ये दारू, रेस्टॉरंट आदी सोडून इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. काही लोकांनी दुकाने सुरूकेली परंतु पोलिसांनी येऊन त्यांना ती बंद करायला लावली. १७ मे पर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळून काहीही सुरू होणार नाही, असे सांगण्यात आले. रेशन वाटपाबाबतही असेच चित्र होते. त्यामुळेच बराच गोंधळ उडाला होता.मुळातच पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासंबंधातील नियमित आढावा बैठक होत असते. त्यात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत चर्चा होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीत असतात. यात ठरलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी अधिकाºयांनी एकत्रितपणे राबवली तर त्याचा नेमका परिणाम दिसून येईल. मात्र तसे होत नाही. मनपा आयुक्त शहरासाठी स्वतंत्रपणे आदेश जारी करतात तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी स्वतंत्र आदेश काढतात. यातून अधिकाºयांमध्ये एकजुटीचा नव्हे तर नियोजनाचाच अभाव दिसून येतो. लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असलेला संभ्रम लोकप्रतिनिधींनाही दूर करण्यास कठीण जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर