शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

CoronaVirus in Nagpur : धक्कादायक : नागपुरात तपासायला नमुनेच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 22:38 IST

नागपूरसह विदर्भात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तपासायला नमुने नसल्याचे  धक्कादायक चित्र समोर आले आहे.  गुरुवारी मेयोने दिवसा २०, मेडिकलने ४४ तर एम्सने ५८ नमुने तपासले आहेत. अशीच जर गती राहिली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देएकाही बाधिताची नोंद नाही : मेयोने २०, मेडिकलने ४४ तर एम्सने तपासले ५८ नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तपासायला नमुने नसल्याचे  धक्कादायक चित्र समोर आले आहे.  गुरुवारी मेयोने दिवसा २०, मेडिकलने ४४ तर एम्सने ५८ नमुने तपासले आहेत. अशीच जर गती राहिली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपुरात रुग्णांची संख्या ९८ वर पोहचली आहे. सलग सात दिवस पॉझिटिव्ह नमुने येत असताना गुरुवारी एकाही नमुन्याची नोंद झाली नाही. यामुळे आरोग्य नियंत्रणाला काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु नमुनेच कमी तपासले जात असल्याने जास्तीत जास्त रुग्णापर्यंत पोहचणार कसे, हा प्रश्न विचारला जात आहे. मेयोच्या प्रयोगशाळेकडे एक जुने व एक नवे यंत्र असताना गुरुवारी दिवसा केवळ २० नमुने तपासल्याचे सांगण्यात येते. अधिक माहिती घेतली असता, त्यांच्याकडे सकाळी तपासणीसाठी नमुनेच नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. सायंकाळपर्यंत नमुने उपलब्ध झाल्याने रात्री ५७ नमुने तपासणीसाठी पाठविले. मेयो, मेडिकल व एम्स मिळून दिवसा १२२ नमुने तपासले आहेत. नागपुरात रोज ४०० वर नमुने तपासण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.१०२ नमुने निगेटिव्हनागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत आज ५८ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील ३९ नमुन्यांमधून २२ नमुने निगेटिव्ह तर आठ नमुने पॉझिटव्ह आले. आठ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. नागपुरातील तपासलेले १३ नमुनेही निगेटिव्ह आले. तर अमरावती जिल्ह्याील सहामधून तीन नमुने निगेटिव्ह तर तीन नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. मेयोने तपासलेले २२ तर मेडिकलने तपासलेले ४४ नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. एकूणच १२२ नमुन्यांमधून १०२ नमुने निगेटिव्ह आले.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ५५दैनिक तपासणी नमुने १२२दैनिक निगेटिव्ह नमुने १०२नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ९८नागपुरातील मृत्यू ०१डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १५डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ११९९क्वारंटाइन कक्षात एकूण संशयित ५२६पीडित-९८-दुरुस्त-१५