शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Coronavirus in Nagpur; धक्कादायक! नागपुरात आयसीयू बेडअभावी ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 07:30 IST

Coronavirus in Nagpur पहिल्या लाटेच्या दरम्यान शासकीय यंत्रणेत अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड वाढविण्याला प्राधान्य देण्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, एकट्या एप्रिल महिन्यात आयसीयू बेड अभावी ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्देमेडिकलमधील वास्तवआयसीयूमध्ये ४८५ तर कॅज्युअल्टीमध्ये १२८ रुग्णांचा मृत्यू

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरूच आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीनंतरही कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले नाही. यातच पहिल्या लाटेच्या दरम्यान शासकीय यंत्रणेत अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेड वाढविण्याला प्राधान्य देण्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, एकट्या एप्रिल महिन्यात आयसीयू बेड अभावी ३६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी त्वरित व निर्णायक पावले उचलण्याची गरज होती. नागपुरात तसे झाले नाही. सप्टेंबर २०१९ मध्ये मेडिकलमध्ये ऑक्सिजनच्या ४०० खाटा वाढवून १००० होणार होत्या. परंतु यालाही कोणीच गांभीर्याने घेतले नाही. सध्याच्या स्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २४५, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ९० तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत सुमारे १५ आयसीयूचे बेड आहेत. साधारण ३५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरातील शासकीय रुग्णालयात केवळ ३५० आयसीयूचे बेडची व्यवस्था आहे. परिणामी, आयसीयू बेडची गरज असणाऱ्या रुग्णालाही नाईलाजाने ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) वॉर्डात ठेवण्याची वेळ मेडिकल प्रशासनावर येत आहे. १ ते २७ एप्रिल दरम्यान ‘एचडीयू’ वॉर्डात ३६५ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.

- कॅज्युअल्टीमधील मृत्यूला जबाबदार कोण?

मेडिकलमध्ये एप्रिल महिन्याच्या २७ तारखेपर्यंत ९८७ कोरोनाबाधितांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले. यातील आयसीयूमध्ये ४८५ रुग्णांचे जीव गेले. धक्कादायक म्हणजे, उपचारासाठी आलेल्या १२८ रुग्णांचा मृत्यू कॅज्युअल्टीमध्ये झाला. वेळेत आवश्यक उपचार न मिळाल्याने झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

-धक्कादायक आकडेवारी

विभाग              मृत्यू               टक्केवारी

आयसीयू           ४८५               ३९.५९ टक्के

कॅज्युअल्टी             १२८           १०.४५ टक्के

प्रिसम्पटिव्ह            ०९              ०.७३ टक्के

एचडीयू                ३६५              २९.८० टक्के

ब्रॉट डेड              २३८                १९.४३ टक्के

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस