शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

CoronaVirus in Nagpur : धक्कादायक ! नागपुरात २७४ पॉझिटिव्ह, १० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:08 IST

शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४९९ रुग्ण व १६ मृतांची भर पडली. सोमवारी २७४ रुग्ण १० मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,३३६ तर मृतांची संख्या ९३ झाली आहे. विशेष म्हणजे, खासगी लॅबमध्ये आज ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्दे नागपुरात ११९ तर ग्रामीणमध्ये १५५ बाधित : ४८ तासात ४९९ रुग्ण, १६ मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाचा कहर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४९९ रुग्ण व १६ मृतांची भर पडली. सोमवारी २७४ रुग्ण १० मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसातील ही विक्रमी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,३३६ तर मृतांची संख्या ९३ झाली आहे. विशेष म्हणजे, खासगी लॅबमध्ये आज ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.नागपुरात दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाल्याने याचा प्रभाव रुग्णसंख्येवर होण्याची चर्चा सुरू असताना, रुग्णसंख्येसोबतच मृतांची सर्वाधिक नोंद झाली. मेडिकलमध्ये पहिल्यांदाच सहा रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली. यात बैद्यनाथ चौक येथील पुरुषाला २४ जुलै रोजी मेडिकलमध्ये भरती करून उपचार सुरू असताना आज सायंकाळी मृत्यू झाला. दुसरा मृत्यू आग्यारामदेवी परिसरातील ६३ वर्षीय रुग्णाचा आहे. हा रुग्ण २१ जुलैपासून मेडिकलमध्ये उपचारासाठी होता. तिसरा मृत्यू मोठा ताजबाग येथील ५७ वर्षीय महिलेचा झाला आहे. ही महिला २४ जुलैपासून मेडिकलमध्ये उपचाराला होती. चौथा मृत्य महादुला येथील ४५ वर्षीय पुरुषाचा आहे. हा रुग्णही २४ जुलैपासून मेडिकलमध्ये भरती होता. पाचवा मृत्यू अनमोलनगर येथील ६३ वर्षीय पुरुषाचा आहे. सहावा मृत्यू कमाल चौक परिसरातील पुरुषाचा आहे. १७ जुलैपासून या रुग्णावर उपचार सुरू होते. याशिवाय मेयोमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाला. यात लष्करीबाग येथील ४३ वर्षीय महिला, डिगडोह हिंगणा येथील ५० वर्षीय पुरुष, पेन्शननगर येथील ७४ वर्षीय पुरुष व नाईक रोड महाल येथील ६९ वर्षीय पुरुष आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना न्यूमोनिया, उच्चरक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याचे समोर आले आहे.खासगी लॅबमधून ११३ रुग्ण पॉझिटिव्हपॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ११९ रुग्ण शहरातील असून, १५५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. विशेष म्हणजे, खासगी लॅबमध्ये प्रथमच ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मेयोच्या प्रयोगशाळेतून ४३, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ३१, एम्सच्या प्रयोगशाळेतून ६५, नीरीच्या प्रयोगशाळेतून ९, माफसूच्या प्रयोगशाळेतून १०, अ‍ॅन्टिजन चाचणीतून ३ असे एकूण २७४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची संख्या २,५८३ झाली आहे. सध्या १६६५ रुग्ण उपचार घेत आहेत.या वसाहतीत आढळून आले रुग्णआरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये काँग्रेसनगरमधील १०, छावणी १, पारडी ७, कोराडी रोड ५, हुडकेश्वर रोड २, बंगाली पंजा इतवारी ८, लक्ष्मीनगर ५, जाफरनगर १०, बेलतरोडी २, झिंगाबाई टाकळी १, डिप्टीसिग्नल कुंभारपुरा २, क्रिष्णानगर नारा रोड ६, राधे ले-आऊट बालाजीनगर १, गोरेवाडा रोड २, अंबाझरी हिलटॉप १, गणपतीनगर गोधनी रोड ५, नारी रोड ३, कुंदनलाल गुप्तानगर १, रजत संकुल गणेशपेठ २, तकीया मोमीनपुरा २, क्रिष्णानगर वाठोडा २, टेकानाका ४, जयप्रकाशनगर खामला १, कळमना रोड १, सतरंजीपुरा ३२, मरियमनगर ३, सिव्हिल लाईन्स १, शांतिनगर १, त्रिमूर्तीनगर १, भांडेवाडी १, खरबी ३, पंजाबी लाईन गड्डीगोदाम १, तांडापेठ १, चंद्रनगर १, टेलिकॉमनगर १, कपिलनगर ३, राणी दुर्गावती चौक १३, वैशालीनगर २, वायुसेना १, जुना बगडगंज १, पंचशीलनगर १, कामगार कॉलनी सुभाषनगर १, शंभूनगर १, टिळकनगर १, स्वावलंबीनगर १, फ्रीडम फायटर कॉलनी १, भुतेश्वरनगर महाल २, सुरेंद्रगड सेमिनरी हिल्स १, शांतिनगर १, गांधीबाग १, गांधीनगर १, प्रशांतनगर १, श्रीनगर १, कुकरेजा निवास जरीपटका २, मानेवाडा १, पार्वतीनगर २, नंदनवन १, अजनी १, इंदोरा चौक १, यादवनगर १, संत्रा मार्केट १, न्यू सुभेदार ले-आऊट १, ओमकारनगर १ असे एकूण १७६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.दैनिक संशयित : ४३०बाधित रुग्ण : ४,३३६बरे झालेले : २,५८३उपचार घेत असलेले रुग्ण : १६६५मृत्यू : ९३

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर