शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

CoronaVirus in Nagpur : सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा अधिक रुग्ण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 20:50 IST

Corona Virus जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसून आली. मंगळवारी जिल्ह्यात ६ हजार २८७ नवे रुग्ण आढळले, तर ६ हजार ८६३ रुग्ण ठीक झाले. मात्र परत एकदा मृताचा आकडा शंभरहून अधिक होता व १०१ जणांनी जीव गमावला.

ठळक मुद्दे६,२८७ नवीन बाधितांची नोंद : १०१ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दिसून आली. मंगळवारी जिल्ह्यात ६ हजार २८७ नवे रुग्ण आढळले, तर ६ हजार ८६३ रुग्ण ठीक झाले. मात्र परत एकदा मृताचा आकडा शंभरहून अधिक होता व १०१ जणांनी जीव गमावला.

सोमवारी ५ हजार ९२१ रुग्ण ठीक झाले होते तर रविवारी ५ हजार ८५२ जण ठीक झाले होते. अशाच प्रकारे ठीक होणाऱ्यांची संख्या वाढत गेली तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत जाईल. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ८६ हजार ३२७ बाधित आढळले असून, ७ हजार १२६ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात २२ हजार ९०८ नमुन्यांची तपासणी झाली. यात शहरातील १७ हजार १२३ व ग्रामीणमधील ५ हजार ७८५ चाचण्यांचा समावेश होता.

शहरात कमी होतेय संख्या

नागपूर शहरात बाधितांची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. परंतु ग्रामीण भागात मात्र संसर्गाची दाहकता कायम आहे. मंगळवारच्या अहवालात शहरातील ३ हजार ८१३ तर ग्रामीणमधील २ हजार ४६६ बाधित होते. मृतांमध्ये शहरातील ५४, ग्रामीणमधील ३९ व जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश होता.

ठीक झालेल्यांची संख्या तीन लाखापार

नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ठीक झालेल्यांची संख्या तीन लाखाहून अधिक झाली आहे. मंगळवारी ६ हजार ६८३ रुग्ण ठीक झाले. यात शहरातील ४ हजार ४८८ तर ग्रामीणमधील २ हजार ३७५ जणांचा समावेश होता. आतापर्यंत ३ लाख २ हजार ४८० बाधित ठीक झाले आहेत. रिकव्हरीचा दर ७८.३० वर पोहोचला आहे.

७६ हजार सक्रिय रुग्ण

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या ७६ हजार ७२१ इतकी होती. यात शहरातील ४६ हजार १७२ व ग्रामीणमधील ३० हजार ५४९ इतके रुग्ण आहेत. होम आयसोलेशनमध्ये ६१ हजार ४९९ रुग्ण असून, विविध रुग्णालयात १५ हजार २२२ रुग्ण भरती आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर