शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

CoronaVirus in Nagpur : नागपुरात प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढली : रोज १००वर तपासले जात आहेत नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 00:25 IST

बुधवारपासून दिल्लीसह निजामुद्दीन मरकज येथून आलेल्या प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याने प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देमेयोच्या प्रयोशाळेवर वाढला भार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या स्थीर झाली आहे. गेल्या तीन दिवसांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. यांच्या संपर्कात आलेल्या बहुसंख्य संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. यामुळे मेयोच्या प्रयोगशाळेवरील तपासणीचा भार कमी होण्याची शक्यता होती, परंतु बुधवारपासून दिल्लीसह निजामुद्दीन मरकज येथून आलेल्या प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याने प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) विदर्भासह छत्तीसगड व मध्यप्रदेशातून आलेल्या कोरोना संशयिताचे नमुने तपासले जातात. नमुन्यांचा अहवाल लवकर मिळण्यासाठी तीन पाळीत प्रयोगशाळा सुरू ठेवली जात आहे. यामुळेच आतापर्यंत ७६७ नमुने तपासणे शक्य झाले आहे. ३१ मार्चपासून पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नसल्याने व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने प्रयोगशाळेवरील भार कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु दिल्ली व निजामुद्दीन मरकजमधून आलेल्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताच खबरदारी यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रयोगशाळेवर नमुन्यांचा भार पडला आहे. मंगळवारी ११०, बुधवारी ९८ तर गुरुवारी १०९ तपासण्यात आले आहे. नमुने वाढल्याने तपासणीसाठी लागणारी किटचा तुटवडा पडू नये म्हणून अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया स्वत:हून लक्ष ठेवून आहेत.  नमुन्याचा अहवालाची १२ ते २४ तासांची प्रतिक्षा विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या दिल्ली प्रवाशांचे नमुने निगेटिव्ह आल्यावरच त्यांना घरी सोडण्याचा सूचना आहेत. परंतु प्रलंबति नमुन्यांची संख्या वाढल्याने १२ ते २४ तास विलगीकरण कक्षातच थांबण्याची वेळ प्रवाश्यांवर आली आहे. यातील काही प्रवाशी नमुनाचा अहवाल येण्यापूर्वीच घरी जाण्यास अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याची माहिती आहे.

२४ तास प्रयोगशाळा सुरूकोरोना संशयितांचे नमुने वाढले आहेत. २४ तास प्रयोगशाळा सुरू आहे. तपासणीसाठी लागणारी किटचा तुटवडा होऊ नये म्हणून त्याचा पाठपुरावा केला जात आहे.

-डॉ. अजय केवलियाअधिष्ठाता, मेयो

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)