शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

CoronaVirus in Nagpur : मेयोमध्ये आता रोज २५० वर नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 20:05 IST

जिल्हा प्रशासन आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) पुढाकारामुळे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमधील ‘पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) हे यंत्र मंगळवारी मेयोला उपलब्ध झाले. या यंत्रामुळे एकाच दिवशी २५० वर नमुने तपासण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दिले यंत्रलोकमत इम्पॅक्ट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा प्रशासन आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) पुढाकारामुळे प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमधील ‘पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) हे यंत्र मंगळवारी मेयोला उपलब्ध झाले. या यंत्रामुळे एकाच दिवशी २५० वर नमुने तपासण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘तीन प्रयोगशाळेनंतरही चाचणीचा वेग संथच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यात रोज ३०० वर तपासणी होण्याची गरज असताना, २०० ही तपासण्या होत नसल्याचे वास्तव मांडले. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतही कोरोना तपासणी होऊ शकते किंवा येथील यंत्र मेयो किंवा एम्सच्या प्रयोगशाळेला उपलब्ध झाल्यास चाचणीचा वेग वाढू शकतो, असे नमूद केले होते. शासानाने याची दखल घेतल्याने प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे यंत्र मेयोला उपलब्ध होऊ शकले. मेयोमध्ये जुने आणि नवीन असे दोन यंत्र आहेत. जुन्या यंत्रावर १८ पेक्षा जास्त व नव्या यंत्रावर ३० पेक्षा जास्त नमुने तपासणे शक्य होत नव्हते. या एका सायकलला पाच ते सहा तासाचा वेळ लागतो. यामुळे दिवसभरात १०० वर नमुने तपासले जात नव्हते. शिवाय प्रयोगशाळेकडे नागपूरसह गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्याचा भार होता. यामुळे नागपुरातील जास्तीत जास्त नमुने तपासणे शक्य होत नव्हते. परंतु आता मेयो आणि एम्सकडे नागपूर शहर व ग्रामीणचे नमुने तपासण्याच्या नव्या सूचना आल्या आहेत. यात आणखी एक यंत्र उपलब्ध झाल्याने नमुने तपासण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात यंत्र रुग्णसेवेतप्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून त्यांचे ‘पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) हे यंत्र मेयोच्या प्रयोगशाळेत उपलब्ध झाले आहे. पुढील दोन दिवसात हे यंत्र रुग्णसेवेत सुरू होईल. यामुळे नमुन्यांचा चाचणीची संख्या नक्कीच वाढेल. याचा फायदा रुग्णसेवेला होईल.- डॉ. अजय केवलिया अधिष्ठाता, मेयो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)