शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Nagpur; नागपुरात कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी आता नि:शुल्क लाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 08:39 IST

Coronavirus in Nagpur कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशान्वये मनपाचे उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना यासंबंधी पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देसर्व झोनच्या सहायक आयुक्तांना पाठविले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशान्वये मनपाचे उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना यासंबंधी पत्र पाठविले आहे.

महापालिकेच्या एकूण १६ दहनघाटांपैकी ६ दहनघाटांवर ब्रिकेट्सद्वारे नि:शुल्क अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तर लाकडांकरिता शुल्क आकारण्यात येत होते. लाेकमत’ने ही बाब मंगळवारी वृत्ताद्वारे मांडली. त्याची दखल घेत यापुढे शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच कोराेनामुळे मृत पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व दहनघाटावर मोफत लाकडे उपलब्ध करण्याला मनपाने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व घाटांवर कोरोना मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी नि:शुल्क लाकडे पुरविण्यात येतील.

मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आता सहकारनगर, अंबाझरी, मानेवाडा, मोक्षधाम, गंगाबाई, मानकापूर या दहनघाटांवर कोरोनाबाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्काराकरिता पुढील आदेशापर्यंत नि:शुल्क लाकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या आदेशाची सर्व झोनस्तरावर अंमलबजावणी केली जाणार आहे. मनपातील माजी विधी सभापती धर्मपाल मेश्राम यांनी सर्व घाटावर मोफत लाकडे उपलब्ध करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस