शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:04 IST

कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग कायम असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात सर्वाधिक ६४ बळीची नोंद झाली असताना शुक्रवारी ही संख्या ३८वर आली.

ठळक मुद्दे३८ मृत्यू तर १,२०५ रुग्णांची नोंद : शहरातील ८४८, ग्रामीणमधील ३४९ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग कायम असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात सर्वाधिक ६४ बळीची नोंद झाली असताना शुक्रवारी ही संख्या ३८वर आली. आज १,२०५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ८४८, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील आठ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णसंख्या ७४,२३१ झाली असून मृतांची संख्या २,३४०वर पोहचली आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद सप्टेंबर महिन्यात झाली. ऑगस्ट महिन्यात १५ ते ३० दरम्यान रोज मृत्यूची नोंद व्हायची परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मृतांचा आकडा ४०वर गेला. १६ सप्टेंबर रोजी ६० वर तर १७ सप्टेंबर रोजी मृतांची संख्या ६४ वर गेली होती. या आठवड्यात ही संख्या ४० ते ५०च्या घरात होती. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील १,७११, ग्रामीणमधील ४०२ तर जिल्ह्याबाहेरील २२७ आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.१५ टक्के आहे.आठवड्यात ३३० मृत्यू, ८,४४२ पॉझिटिव्हया आठवड्यात नागपूर जिल्ह्यात ३३० रुग्णांचे बळी गेले तर ८,४४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मृत्यू व रुग्णसंख्येत किंचीत घट आली आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू मेडिकलमध्ये झाले. १,०३७ मृत्यूची नोंद आहे. मेयोमध्ये ९५४ तर एम्समध्ये तीन बळी गेले. उर्वरित ३४० रुग्णांचे मृत्यू खासगी हॉस्पिटलमध्ये झाले आहेत.३,२३१ अ‍ॅन्टिजेन चाचणीतून २,९९६ रुग्ण निगेटिव्हआज ३,२३१ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात २३५ रुग्ण पॉझिटिव्ह तर २,९९६ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. तर आरटीपीसीआर चाचणीत एम्सच्या प्रयोगशाळेतून १८९, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ६५, मेयोच्या प्रयोगशाळेतून १७१, माफसुच्या प्रयोगशाळेतून ५२, नीरीच्या प्रयोगशाळेतून ६९ तर खासगी लॅबमधून ४२४ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले.बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिकआज १,२०६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असले तरी १,५३६ रुग्ण बरे झाले. बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५६,६१६ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील ४५,६५३ तर ग्रामीणमधील १०,९६३ रुग्ण आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ७६.२७ टक्के आहे. सध्या १५,२७५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचाराखाली आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,२६०बाधित रुग्ण : ७४,२३१बरे झालेले : ५६,६१६उपचार घेत असलेले रुग्ण : १५,२७५मृत्यू : २,३४०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू