शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात मृत्यूंनी गाठले चौथे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:01 IST

नागपूर जिल्ह्यात बुधवारी २७ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. आजच्या मृतांच्या या आकडेवारीबरोबरच जिल्ह्यात कोरोनाने चौथे शतक गाठले आहे. मृतांचा ४०० चा आकडा गाठण्यासाठी १३० दिवस लागले आहेत.

ठळक मुद्देशहरात ४१३, ग्रामीणमध्ये २०८ पॉझिटिव्ह निघाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी २७ कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. आजच्या मृतांच्या या आकडेवारीबरोबरच जिल्ह्यात कोरोनाने चौथे शतक गाठले आहे. मृतांचा ४०० चा आकडा गाठण्यासाठी १३० दिवस लागले आहेत. ५ एप्रिल रोजी नागपुरात कोरोनामुळे पहिला बळी गेला होता. त्यानंतर मृत्यूचे प्रमाण सुरूच होते. ऑगस्ट महिन्यात १२ दिवसात २७३ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची वाढती आकडेवारी लक्षात घेता कोरोनाचे संक्रमण तीव्र झाले आहे. बुधवारी शहरात २४ तर ग्रामीणमध्ये २ व जिल्ह्याच्या बाहेरील १ पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.तर बुधवारी ६२१ नवीन पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचबरोबर आता संक्रमितांची संख्या १०,९८२ झाली आहे. यात शहरातील ४१३ व ग्रामीणमधील २०८ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे बुधवारी ३१२ लोक बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण ५,३२७ पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. ज्या वेगात रुग्ण आढळत आहे, त्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट ४८.५० टक्क्यांवर आला आहे. मेडिकलमध्ये आज ३ रुग्णांचा मृत्यू झाला. यात गंजीपेठ येथील ६८ वर्षीय महिला, कामठी येथील ६५ वर्षीय महिला व ४७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर मृतांची आकडेवारी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून उपलब्ध होऊ शकली नाही.नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या मृतांमध्ये २७९ शहरातील असून, ६८ नागपूर ग्रामीण व ५३ जिल्ह्याबाहेरील आहेत. तसेच एकूण संक्रमितांपैकी ७६०९ शहरातील, ३३७३ ग्रामीण भागातील आहेत. शहरातील आकडेवारीत जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या १३० रुग्णांचा समावेश आहे. आज एकूण २५७९ नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत १ लाख ५ हजार ८९८ नमुन्यांची तपासणी झाली आहे.अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये ३२२ पॉझिटिव्हनागपुरात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३२२ नमुने अ‍ॅन्टिजेन टेस्टचे आहेत. त्याचबरोबर मेयोच्या लॅबमधून ८२, मेडिकलच्या लॅबमधून ५६, एम्सच्या लॅबमधून ६१, नीरी २ व खासगी लॅबमधून ९८ नमुने पॉझिटिव्ह आले आहे.मध्य रेल्वे नागपूर विभागातील गार्डचा मृत्यूमध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील एका गार्डचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित गार्डच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्याची मागणी होत आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील गार्डला ६ ऑगस्टला ताप आला होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तो शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. ८ ऑगस्टला त्याची कोरोना चाचणी झाली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी १२ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मृत्यूस रेल्वे प्रशासन आणि मेयो रुग्णालयाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष वीरेंद्र सिंह यांनी केला आहे. यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांचे उपचार खासगी रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.बीएसएनएलमध्ये दोन तर एसीबीत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्हभारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या महाव्यवस्थापक कार्यालयात दोन कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळून आले. ते इमारतीच्या पाचव्या माळ्यावरील प्लॅनिंग सेक्शनचे कर्मचारी आहेत. माहितीनुसार मागील काही दिवसापासून प्रकृती बिघडल्याने ते कार्यालयात येत नव्हते. यापैकी एकाची गर्भवती पत्नी कोरोना पॉझिटिव्ह होती तर दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एक सदस्य पॉझिटिव्ह आहे.बुधवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कार्यालयात याची माहिती होताच सर्व कर्मचारी हादरले आहेत. आता या इमारतीतील सर्व ३३ कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात येईल. दरम्यान बुधवारी बीएसएनएलकडून विभागीय स्तरावर एक आदेश जारी करण्यात आला आहे. यात असे म्हटले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना सर्दी, खोकला असेल तर त्यांनी ऑफिसमध्ये येऊ नये, त्यांची सुटी मंजूर केली जाईल.यासोबतच अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोमध्ये एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा कर्मचारी एसीबीच्या विभागीय कार्यालयात तैनात होता. तो शनिवारी एका नातेवाईकाच्या संपर्कात आला होता. जो नंतर पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले. यानंतर या कर्मचाऱ्याचीही तपासणी करण्यात आली असता तोही पॉझिटिव्ह आढळून आला. यानंतर त्याच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली असून यात कुणीही पॉझिटिव्ह आढळले नाहीत.सद्यस्थितीअ‍ॅक्टिव्ह ५२५५बरे झाले ५३२७मृत ४००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू