शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
3
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
4
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
5
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
6
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
7
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
8
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
9
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
10
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
11
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
12
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
14
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
15
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
16
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
17
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
18
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
19
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
20
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."

Coronavirus in Nagpur; आता नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना थेट भरती करून घेता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 07:21 IST

Nagpur News Coronavirus मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपूर शहर व जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेंट्रल कंट्रोल रूम स्थापन केला आहे. यासंदर्भात मंगळवारी आदेश जारी करण्यात आला.

ठळक मुद्देकंट्रोल रूम स्थापनमनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपूर शहर व जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सेंट्रल कंट्रोल रूम स्थापन केला आहे. यासंदर्भात मंगळवारी आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार यापुढे कोणत्याही रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना थेट भरती करता येणार नाही. यासंदर्भात आता सेंट्रल कंट्रोल रूमद्वारे आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

सदर कंट्रोल रूम महानगरपालिका इमारतीच्या सहाव्या माळ्यावर सर्व दिवशी २४ तास कार्यरत राहणार आहे. कंट्रोल रूमकरिता स्वतंत्र फोन क्रमांक व व्हॉट्सअ‍ॅप सुविधा असणारे मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत. गरजू नागरिकांना संबंधित क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक मदतीची मागणी करता येणार आहे. कंट्रोल रूम पथकाची सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन पाळीमध्ये विभागणी करण्यात आली आहे. हे पथक कोरोना रुग्णांचा आरटीपीसीआर अहवाल, एचआरसीटी अहवाल इत्यादी माहिती घेऊन त्या आधारावर रुग्णांना भरती करणे किंवा घरीच उपचार करण्यावर अर्ध्या तासात आवश्यक निर्णय घेईल. तसेच, समर्पित सॉफ्टवेअरद्वारे खाट बुक करून संबंधित सर्व माहिती व ओटीपी रुग्ण किंवा त्याच्या नातेवाइकाला कळवली जाईल. ओटीपी दोन तास वैध राहील. या वेळेत रुग्ण भरती न झाल्यास संबंधित खाट रिक्त घोषित करून दुसऱ्या रुग्णांस दिली जाईल. एखादा रुग्ण गंभीर असल्यास रुग्णालये त्याला भरती करून तातडीने उपचार सुरू करू शकतील; परंतु याबाबत फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित रुग्णालयावर कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल.

औषधे वितरणाचे नियोजन

कोरोनावर प्रभावी सिद्ध होत असलेले रेमडेसिविर, टोसिलिझुमाब इत्यादी औषधांचे कोरोना रुग्णालयांना समान वितरण करण्याची जबाबदारी आता कंट्रोल रूम सांभाळेल. तसेच कोरोना रुग्णालयांनी या औषधांची केलेली मागणी व त्यानुसार त्यांना औषधांचा पुरवठा करण्यावरही कंट्रोल रूम लक्ष ठेवणार आहे.

ऑक्सिजन वितरणावर पाळत

कंट्रोल रूम ऑक्सिजन वितरणावर पाळत ठेवणार आहे. तसेच यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी कार्य करणार आहे. ऑक्सिजन खरेदी, नियोजन व वितरण करण्याची जबाबदारीही कंट्रोल रूमवर आहे.

असे आहेत संपर्क क्रमांक

१ - कोरोना खाट मिळविण्यासाठी : ०७१२-२५६७०२१, ७७७००११५३७, ७७७००११४७२़

२ - कोरोना औषधे व ऑक्सिजन मिळविण्यासाठी : ०७१२-२५५१८६६, ७७७००११९७४

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस