शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा प्रकोप, पुन्हा सात वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:27 IST

सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी याच संपर्कातील सात रुग्णांची नोंद झाली आहे. यात तीन अल्पवयीन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या ८०वर पोहचली आहे.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या ८० : २० दिवसात ६४ रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा संपर्कातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी याच संपर्कातील सात रुग्णांची नोंद झाली आहे. यात तीन अल्पवयीन मुले व एका वृद्धाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या ८०वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात नागपुरात केवळ १६ रुग्णांची नोंद होती. परंतु एप्रिल महिन्याच्या २० तारखेपर्यंत ६४ रुग्णांचे निदान झाले आहे. ट्रॅव्हल्स एजन्सी संचालकाकडून सतरंजीपुऱ्यातील मृत व त्याच्या नातेवाईकाकडून इतरांना लागण होणाऱ्याची संख्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. यांच्या संपर्कात आलेल्या १९९ संशयितांना संस्थात्मक अलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. यातील ४४ संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह तर ११ नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित १४४ संशयितांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. नागपुरात तीन प्रयोगशाळा आहेत. त्यांच्याकडे विदर्भातील इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नमुन्यांची संख्याही कमी झाली आहे. नागपुरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मोठ्या संख्येत नमुने तपासून रुग्णांच्या संपर्कातील लोकांना हुडकून काढणे गरजेचे आहे. -एम्स व मेयामध्ये एक तर मेडिकलच्या प्रयोगशाळेत पाच पॉझिटिव्ह मेडिकलच्या प्रयोगशाळेत ११ वर्षीय मुलगी, १० वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष सर्व राहणार सतरंजीपुरा तर शांतिनगर येथील ६० वर्षीय महिलेचे नमुने कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. या सर्वांना आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आले होते. एम्सच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेला १३ वर्षीय मुलाचा नमुना पॉझिटिव्ह आला, तर मेयोच्या प्रयोगशाळेत लोणारा येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या सतरंजीपुऱ्यातील ५० वर्षीय रुग्णाचेही नमुने पॉझिटिव्ह आले. नागपुरात आतापर्यंत ८० रुग्णांची नोंद झाली असून, यातील १२ रुग्ण बरे तर एकाच्या मृत्यूची नोंद आहे. -२२७ मधून १८०नमुने निगेटिव्ह मेडिकलच्या प्रयोगशाळेत ९६ नमुने तपासण्यात आले. यात पाच नमुने पॉझिटिव्ह आले असून, ३४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नव्हता. उर्वरित ५७ नमुने निगेटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत ४१ नमुने तपासले, यात यवतमाळ व नागपुरातील प्रत्येकी एक नमुना पॉझिटिव्ह आला. पाच नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. ३४ नमुने निगेटिव्ह आले. मेयोने २४ तासात ९० नमुने तपासले. यातील एक पॉझिटिव्ह सोडल्यास उर्वरित ८९नमुने निगेटिव्ह आले आहेत. -११ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह, आई-वडील चिंतित--सतरंजीपुऱ्यातील बाधितांच्या संपर्कात आलेल्या आई-वडिलांसह ११वर्षीय मुलीला चार दिवसापूर्वी आमदार निवासात संशयित म्हणून दाखल केले. त्याच दिवशी नमुने घेतले. मात्र आज मुलीचाच अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आई-वडिलांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला नव्हता. मनपाचे आरोग्य पथक मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आले असताना दोघांनी विरोध केला. शेवटी मुलीसोबत आई जाईल, असा निर्णय घेण्यात आला. आता मुलगी आणि आई मेडिकलमध्ये तर वडील आमदार निवासात आहेत.कोरोनाची आजची स्थिती

  • दैनिक संशयित ८३
  • दैनिक तपासणी नमुने २२७
  • दैनिक निगेटिव्ह नमुने १८०
  • नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ८०
  • नागपुरातील मृत्यू ०१
  • डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १२
  • डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ११२०
  • क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ६२२
टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर