शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : विदर्भात ८९७ नमुन्यांमधून २३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 20:48 IST

विदर्भातून आलेल्या ८९७ नमुन्यांची तपासणी केली असता आतापर्यंत ८७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर २३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे‘तो’ मृतक निगेटिव्ह : आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातून आलेल्या ८९७ नमुन्यांची तपासणी केली असता आतापर्यंत ८७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर २३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यात मेयो व मेडिकल मिळून ५६५ नमुन्यांमधून १६, यवतमाळमधील २७ नमुन्यांमधून तीन, गोंदियामधील १६ नमुन्यांमधून एक तर यवतमाळमधील २३ नमुन्यांमधून तीन नमुने पॉझिटिव्ह आहेत. विशेष म्हणजे, सोमवारी खळबळ उडवून दिलेल्या कोरोना संशयित मृताचे नमुनेही मंगळवारी निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर येथील ५५ वर्षीय रुग्ण गेल्या पाच दिवसांपासून नागपूरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती होता. रुग्णाला सर्दी, खोकला व दम लागत होता. गेल्या दोन दिवसांपासून त्याच्यात न्युमोनियाची लक्षणे दिसून आली. रुग्णाला कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी मेयो रुग्णालयात सोमवारी दुपारी ४ वाजता पाठविण्यात आले. परंतु दोन तासातच रुग्णाचा मृत्यू झाला. या मृत्यूचा धसका सर्वांनीच घेतला. नमुन्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळी अहवाल निगेटिव्ह येताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. सोमवारी आलेल्या १०१ नमुन्यांमधून ९९ नमुने निगेटिव्ह आले, तर बुलडाण्यातील दोन नमुने पॉझिटिव्ह आले.येथे पॉझिटिव्ह नाहीअमरावतीमधून ७१, वर्धा येथून १७, सेवाग्राम येथून सहा, सावंगी वर्धा येथून एक, अकोला येथून ३०, चंद्रपूर येथून नऊ, वाशिम येथून एक, खामगाव येथून सहा, गडचिरोली येथून २०, भंडारा येथून सात, सैनिक हॉस्पिटलमधून एक, लता मंगेशकर हॉस्पिटलमधून एक, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमधून दोन, एम्समधून एक, छत्तीसगडमधून १९ तर मध्य प्रदेशातून आलेल्या आठ नमुन्यात एकही पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही.विदर्भातील स्थिती जिल्हा               रुग्ण             मृत्यूनागपूर              १६                ००यवतमाळ         ०३                ००गोंदिया             ०१                ००बुलडाणा          ०३                ०१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याVidarbhaविदर्भ