शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
2
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
3
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
4
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
6
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
7
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
8
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
9
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
10
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
12
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
13
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
14
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
15
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
16
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
17
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
18
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
19
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
20
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार

CoronaVirus in Nagpur : १४ दिवसांची अग्निपरीक्षा संपली : तो रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:28 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाला. रुग्णालयातील १४ दिवस पूर्ण झाल्याने व तीनही नमुने निगेटिव्ह आल्याने गुरुवारी मेयोतून रुग्णवाहिकेने त्याला घरी सोडण्यात आले.

ठळक मुद्देरुग्णालयातून घरी सोडले, वैद्यकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नागपुरातील पहिला रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाला. रुग्णालयातील १४ दिवस पूर्ण झाल्याने व तीनही नमुने निगेटिव्ह आल्याने गुरुवारी मेयोतून रुग्णवाहिकेने त्याला घरी सोडण्यात आले. कोरोनाबाधित ते कोरोनामुक्त हा प्रवास अग्निपरीक्षेचा होता. माझ्यातला आत्मविश्वास, डॉक्टरांचे प्रयत्न आणि आपल्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे मी घरी जात आहे, अशी भावनाही त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. विशेष म्हणजे, रुग्णवाहिकेत बसताना कोरोनामुक्त रुग्णाने सर्व डॉक्टरांचे, परिचारिकांचे व कर्मचाऱ्यांचे हात जोडून आभार मानले. त्यांच्या सेवेला त्यांनी सलामही केला. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत, विभागीय आयुक्त संजीव कुमार, अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजीत बांगर, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे, औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोतमा रमेश पराते, डॉ. रवी चव्हाण व अनेक वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते. आपल्या रुग्णालयातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन जात असतानाचा उत्साह या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेले ही ४५ वर्षीय व्यक्ती सहा मार्च रोजी नागपुरात आली. सर्दी, खोकला व ताप असल्याने ११ मार्च रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल झाली. त्याच दिवशी त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले. अहवालात त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मेयोच्या वॉर्ड क्रमांक २४ या आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले. डॉक्टरांनुसार, पहिल्या दिवशीपासून बाधित रुग्णाने उपचाराला सहकार्य केले. आमच्याकडून या आजाराची बारीकसारीक माहिती घेतली. काय करायला हवे, काय नको या सारखे अनेक प्रश्न विचारले. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने या दरम्यान त्यांनी पहिल्या दिवसांपासून धार्मिक ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी पॉझिटिव्ह आल्याने ते चिंतेतही होते. सात दिवसानंतर करण्यात आलेल्या चाचणीत ते निगेटिव्ह आले. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला होता. १४ दिवसांनंतर बुधवारी त्यांचे नमुने तपासले असता दुसरे नमुनेही निगेटिव्ह आले. २४ तासांनंतर पुन्हा नमुने तपासले असता गुरुवारी सकाळी नमुने निगेटिव्ह आले. त्यांना जेव्हा याची माहिती दिली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. देवासोबत डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले. डॉ. सागर पांडे यांनी सांगितले, पुढील १४ दिवस या कोरोनामुक्त व्यक्तीला सक्तीने घरीच थांबायचे आहे. दिवसातून दोन वेळा त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली जाणार आहे.बंदिस्त जीवनाने खूप काही शिकविलेबाधित रुग्णाने ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, हे १४ दिवस म्हणजे अग्निपरीक्षाच होती. या बंदिस्त जीवनाने खूप काही शिकविले. जेव्हा पहिला नमुना पॉझिटिव्ह आला तेव्हा घाबरलो होतो. परंतु डॉक्टरांनी आणि घरच्या लोकांनी फोनवरून हिंमत बांधली. सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केली. या दरम्यान धर्मग्रंथ वाचले. यामुळे नवी ऊर्जा मिळाली. पहिला नमुना निगेटिव्ह आल्यावर आत्मविश्वास वाढला. आता तर दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने घरी जात आहे. सलग १४ दिवसांनंतर मी आपल्या कुटुंबाला पाहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)