शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाच्या अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:47 IST

महापालिकेचा सन २०२० -२१ या वर्षाचा अर्थसंकल्प लॉकडाऊन सुरू असल्याने सादर करता आला नाही. १७ मेनंतर लॉकडाऊन न हटल्यास जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी झलके यांनी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महापालिकेचा सन २०२० -२१ या वर्षाचा अर्थसंकल्प लॉकडाऊन सुरू असल्याने सादर करता आला नाही. १७ मेनंतर लॉकडाऊन न हटल्यास जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी झलके यांनी सुरू केली आहे. मात्र लॉकडाऊनचा परिणाम मनपाच्या उत्पन्नावर होणार आहे. दुसरीकडे प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर होणाऱ्या खर्चाचा मोठा बोजा मनपाच्या तिजोरीवर पडत असल्याने अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट राहणार आहे.माजी अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी २०१९-२० या वर्षाचा ३,१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्पात मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली होती. सिमेंट रोडसाठी २०० कोटी, केळीबाग रोड, जुना भंडारा रोड, उड्डाणपूल यासाठी ६७२. ७४ कोटी, डांबरी रस्ते १०४ कोटी, खड्डे बुजवण्यासाठी २५.५५ कोटी, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पात मनपाचा वाटा देण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. मात्र मनपाच्या बिकट आर्थिक स्थितीचा विचार करता आयुक्तांनी विकास कामांना ब्रेक लावले. अर्थसंकल्पातील प्रस्तावित विकासकामे कागदावरच राहिली.दुसरीकडे लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यात मालमत्ता कर, पाणी कर, बाजार विभागाच्या वसुलीवर परिणाम झाला. मालमत्ता करापासून ४४३.७० कोटी अपेक्षित असताना २५० कोटीपर्यंतच हा आकडा पोहचला. नगररचना विभागामुळे मात्र मनपाला मोठा दिलासा मिळाला. ९४.९१ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना १९८ कोटींची वसुली झाली. परंतु मागील दोन महिन्यात नगररचना विभागाच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती विचारात घेता मनपाला विशेष अर्थसाहाय्य मिळण्याची शक्यता दिसत नाही.आयुक्तांनी लावली कात्रीमनपा आयुक्तांनी २०१९-२० या वर्षाचा सुधारित अर्थसंकल्प २,६९८.३५ कोटींचा सादर केला. परंतु अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच आयुक्तांनी विकासकामांना कात्री लावली होती. मनपावरील दायित्व व उत्पन्न यांचा विचार करता यात मोठी तफावत आहे. वित्त वर्षातही त्यात फारशी सुधारणा होण्याची शक्यता नाही.अर्थसंकल्पाची तयारी सुरूशहरातील विकासकामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्प लॉकडाऊन संपल्यानंतर जून महिन्यात सादर केला जाईल. अर्थसंकल्पाची तयारी सुरू असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली. वास्तविक एप्रिल महिन्यातच अर्थसंकल्प सादर करण्याचा झलके यांचा विचार होता. परंतु लॉकडाऊनमुळे अर्थसंकल्प सादर करता आलेला नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प