शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

नागपुरात कोरोनाचा कहर; २२५ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू; चार हजाराचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:13 IST

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे सहा दिवसात हजार रुग्णांची नोंद बरे होण्याचे प्रमाण ६४ वरून ६० टक्क्यांवर :

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या भयावह स्थितीत वाढत आहे. रविवारी कोरोनाचे २२५ नवे रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. रुग्णांची संख्या ४०६२ तर मृतांची संख्या ८३ वर पोहचली आहे. रुग्णांची संख्या २०० वर गेल्याने व गेल्या १४ दिवसापासून मृत्यूसत्र सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मेडिकलच्या दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, २० जुलै रोजी जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६४.०५ टक्के होते, ते आता ६०.५३ टक्क्यांवर आले आहे.कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. लोकांनीही प्रतिसाद दिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. मात्र, सोमवारी रस्त्यांवर, दुकानात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व सॅनिटायझेशन महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मेयोमध्ये पाच कोविड पॉझिटिव्ह मृत्यूची नोंद झाली. यात लष्करीबाग येथील ६३ वर्षीय महिला, कामठी येथील ४३ वर्षीय पुरुष, बैतुल मध्य प्रदेश येथील ६५वर्षीय पुरुष, शाकील ले-आऊट गोधनी येथील ४९ वर्षीय पुरुष व पाचपावली येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण होते. पाचपावली येथील पुरुष रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेडिकलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात छत्रपतीनगर कामठी येथील ४५ वर्षीय महिला तर अजनी येथील ४८वर्षीय पुरुष रुग्ण होता. आतापर्यंतच्या मृत्यूमध्ये १५ ग्रामीणमधील, ४८ शहरातील तर २० जिल्ह्याबाहेरील आहेत.

-ग्रामीणमध्ये ५३ तर शहरात १७३ बाधितग्रामीण भागात रविवारी ५३ तर शहरात १७३ असे एकूण २२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मेयोच्या तून ६८, मेडिकलमधून पाच, एम्समधून ३२, नीरीमधून १३, माफसूमधून १६, खासगी लॅबमधून २२, अ­ॅन्टीजन चाचणीतून ६९ रुग्णांचे कोविड निदान झाले. आज ६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४५९ झाली आहे. सद्यस्थितीत १५२१ रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी मेडिकलच्या विविध विभागात आठवर रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे ८० वर डॉक्टर व परिचारिकांचे नमुने तपासण्यात आले होते. यातील दोन इन्टर्न डॉक्टर पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे, २० जुलै रोजी रुग्णांची संख्या ३०२७ होती, ६ दिवसात हजार रुग्णांची वाढ होऊन ती ४०६२ वर पोहचली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस