शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील प्रसिद्ध कुमकोट मंडईवर कोरोनामुळे पडणार विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 07:20 IST

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील प्रसिद्ध कुमकोट येथील राजेश्वरी राजमातादेवी यांच्या पूजनासाठी आयोजित मंडईवर कोरोनामुळे विरजण पडले आहे.

ठळक मुद्देशासनाच्या निर्देशाचे पालन करून होणार राजमाता देवीची पूजा 

गडचिरोलीः   कोरची तालुक्यातील एकमेव प्रख्यात श्रद्धास्थान असलेली कुमकोट येथील 60 गावची राजेश्वरी राजमाता देवी यांच्या पूजेला दरवर्षी श्रद्धालू लोकांची हजारोच्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी गर्दी होतो मात्र यावर्षी कोरोनाची तिसऱ्या लाटेमुळे दिनांक 10 जानेवारीला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या शासन निर्देशानुसार लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन निर्बंध लावण्यात आले आहे त्यामुळे नियमांचे पालन करूनच यावेळी मंदिरात पूजा होणार आहे.

सदर मंडई दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बुधवारी भरतो मात्र यावर्षी ही मंडई 12 जानेवारी 2022 ला येत्या दोन दिवसानंतर भरणार होती. महत्वाचे म्हणजे या ठिकाणची देवमंडई झाल्यानंतरच तालुक्यातील इतर गावांची मंडई भरत असतो. तसेच या मंडई निमित्याने तरुण युवक युवतीमध्ये जास्त उत्साह बघायला मिळतो जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील तरुण-तरुणीला मंडईच्या निमित्याने एकमेकांची भेट होवून लग्न करण्यास मदत होते.         

दरवर्षी याठिकाणी मोठी जत्रा भरतो यामध्ये सर्वाधिक छोटे दुकानदार दुकाने लावत असतात ज्यामध्ये मिठाई,भाजीपाला,चहा नास्ता हॉटेल,पूजा सामग्री,खेळणी,झुले,आकाश पाळणा,पाणीपुरी चाट ठेला,पोस्टर दुकांनाणी सजून भरगच्च मंडई भरत असतो यामध्ये छत्तीसगढ,मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील हजारो श्रद्धालू मंडई जत्रा देवीपुजा निमित्य एकत्र येत असून अनेक वर्षांनीं भेट घेत असतात. यामुळे येथील लहान दुकानदारांना दोन पैसे कमावण्याची संधी मिळत असे मात्र यावर्षी या दुकानदारांना कोरोणाच्या निर्बंधामुळे पोटावर लात बसणार आहे. दरवर्षी श्रद्धालूलोक व लहान-मोठे व्यापारी दुकानदार सर्वातआधी या मंडईची आतुरतेने वाट बघत असतात. तसेच दरवर्षीप्रमाणे यावेळी रात्रोच्यावेळी जोरदार छत्तीसगढी लोककला नृत्याचे नियोजन करण्यात आले होते मात्र ते रद्द करण्यात आले असल्याने रात्रोच्या वेळी नृत्याचं आनंद घेणारे रसिकांना निराशा व्यक्त करित आहेत.     

   या वर्षी गर्दी न करता जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करत फक्त साध्या व सोप्या पद्धतीने कुमकोट राजमाता देवीची पूजा होणार असून मंडई भरणार नसल्याने छोटे व्यापारी दुकानदारांना दुकाने लावण्यास मनाई करण्यात आले असल्याची माहिती येथील आयोजकांनी दिली आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक