शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नागपूरकरांच्या आरोग्यासाठी ‘कोरोना वॉरियर्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 11:29 IST

आरोग्यसेवेचे व्रत घेतलेले मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णाला अहोरात्र सेवा देत आहेत.

ठळक मुद्देत्यांच्या कर्तृत्वाला सलाम मेयो, मेडिकल व आरोग्य विभागाची अहोरात्र सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरानो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालय, मॉल, चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र आरोग्यसेवेचे व्रत घेतलेले मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन कोरोना संशयित व पॉझिटिव्ह रुग्णाला अहोरात्र सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने ते ‘कोरोना वॉरियर्स’ ठरले आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाला नागपूरकरांनी सलाम केला आहे.देशातील १३ राज्यांमधील नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वच राज्यातील बाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. कोरोनाची दहशत घराघरात पोहचली आहे. प्रत्येक जण प्रतिबंधक उपाययोजना करीत आहे, असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), उपसंचालक आरोग्य सेवा व महानगरपालिकेचे आरोग्य विभाग कोरोनाच्या विरोधात उभा ठाकला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांची चिंता आहे. घरून निघताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. बाहेर पडत असताना मोठ्यांच्या, चिमुकल्यांच्या डोळ्यातील चिंता बरेच काही सांगून जात आहे. मात्र, कोरोना विरोधातील लढाईतील हे योद्धे रुग्णालयात आल्यावर सर्वकाही विसरून रुग्णसेवा देत आहेत.

नेमके कसे करतात डॉक्टर काम?डॉक्टर्सना त्यांच्या कामाच्या वेळाचे नियोजन करून देण्यात आले आहे. ते ठरवून दिलेल्या वेळेत मेयो, मेडिकलच्या कोरोना रुग्णांसाठी असलेल्या वॉर्डात हजर असतात.काही आवश्यकतेनुसार १२ ते १५ तास काम करतात. रुग्णांना भेटणे, नोंदणी करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, उपचार करणे, नमुने घेणे, त्याचा अहवाल संबंधितांपर्यंत पोहचविणे, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेणे, त्यांना रुग्णालयात आणणे आदी कार्य करीत आहेत.बाधित देशातून आलेल्या किंवा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परंतु नमुने निगेटिव्ह आलेल्यांना घरीच राहण्याचा सल्ला देत दिवसातून दोनवेळा फोनद्वारे त्यांची प्रकृतीची माहिती घेत आहेत.रुग्णसेवेच्या नियोजनात यांचाही वाटा महत्त्वाचारुग्णसेवेच्या नियोजनात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. कांचन वानखेडे,औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पराते, मायक्रोबायोलॉजी विभागप्रमुख डॉ. शर्मिला राऊत, आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांचाही वाटा महत्त्वाचा आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस