-----
तूर बहरली : गुमगाव परिसरात यंदा पाऊस समाधानकारक झाला आहे. त्यामुळे परिसरात तुरीचे पीक सध्या जोमात आहे. याआधी अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे आता तुरीच्या पिकामुळे अन्य झालेल्या पिकांचे नुकसान थोडेफार भरून काढण्यासाठी नक्कीच हातभार लागेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
गुमगाव-डोंगरगाव रोडवरील वागदरा शिवारातील बब्बू डहाके यांच्या शेतात बहरलेल्या तुरीचे चित्र.
(मधुसूदन चरपे, गुमगाव)