शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात २६ दिवसानी हजाराखाली आली रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:34 IST

कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद याच महिन्यात झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर गेल्या २६ दिवसात पहिल्यांदाच रोजच्या रुग्णाची संख्या हजाराखाली आली. शुक्रवारी ९७१ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या मंदावली असलीतरी मृत्यूची दहशत कायम आहे.

ठळक मुद्दे९७१ रुग्ण व ४१ मृत्यूची नोंद : आकडेवारीतील घोळामुळे रुग्णसंख्या मंदावली का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद याच महिन्यात झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर गेल्या २६ दिवसात पहिल्यांदाच रोजच्या रुग्णाची संख्या हजाराखाली आली. शुक्रवारी ९७१ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या मंदावली असलीतरी मृत्यूची दहशत कायम आहे. आज ४१ रुग्णांचा जीव गेला. मृतांची एकूण संख्या २३०२ झाली असून रुग्णसंख्या ७२,८९९ वर पोहचली आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवातच १४४७ रुग्णांनी झाली. त्यानंतर सलग तीन आठवडे रोजच्या रुग्णांची संख्या १५०० ते २००० हजाराच्या घरात होती. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट दिसून येऊ लागली. यामागे, कमी होत असलेल्या चाचण्या, नमुन्यांचा अहवालास होत असलेला उशीर, की आकडेवारीतील घोळ, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रुग्णसंख्या अशीच हळूहळू कमी होणार का, असा प्रश्नही सामान्यांना पडला आहे.प्रयोगशाळेत १४४० रुग्ण पॉझिटिव्हजिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फ त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध माहितीच्या आधारे आज ९७१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आहे. परंतु याच पत्रकात, शासकीय व खासगी लॅबमधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ही १४४० वर दाखवली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांवरील उपचारात हयगय होत असल्याची ओरड होत असताना, रुग्णसंख्येच्या आकडेवारीतही घोळ होऊ लागल्याने प्रशासनाची कोरोनाबाबतची गंभीरता कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.क्षमतेच्या तुलनेत कमी चाचण्याएकट्या मेयो, मेडिकलमधील प्रयोगशाळेचा चाचण्यांची क्षमता ७०० वर असताना ४०० चाचण्याही होत नसल्याचे चित्र आहे. इतरही प्रयोगशाळेची हीच अवस्था आहे. मनपाच्या केंद्रावर नागरिक चाचणीसाठी सकाळपासून रांग लावून असतात. सर्वच ठिकाणी गर्दी होते. परंतु प्रत्येक केंद्राचे स्वत:चे नियम व दुपारी १ नंतर नमुने घेणे बंद करीत असल्याने कमी चाचण्या होत असल्याचे वास्तव आहे. आज आरटीपीसीआरच्या १७५४ व रॅपीड अ‍ॅन्टिजनच्या ३८४१ असे दोन्ही मिळून ५५९५ चाचण्या झाल्या. मागील आठवड्यात चाचण्यांची संख्या आठ हजारांवर गेली होती.१३१८ रुग्ण बरेपॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासूनचे हे चित्र आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक आहे. आज १३१८ रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५४,८०६ झाली आहे. याचे प्रमाण ७५.१८ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४४१०५ तर ग्रामीणमधील १०७०१ आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६९४७बाधित रुग्ण :७२,८९९बरे झालेले : ५४,८०६उपचार घेत असलेले रुग्ण : १५७९१मृत्यू :२३०२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर