शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:58 IST

कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने शनिवारी खळबळ उडाली. विदर्भात आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू म्हणून याकडे पाहिले जात आहे. यासह आणखी सहा मृत्यूची नोंद झाली. यात दोन तरुणांचाही समावेश आहे. आज १५० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या ३८३७ झाली, तर मृतांची संख्या ७६ वर पोहोचली.

ठळक मुद्देविदर्भातील पहिली घटना : १५० नव्या रुग्णांची भर : ६ मृतांमध्ये २ तरुण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित नऊ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने शनिवारी खळबळ उडाली. विदर्भात आतापर्यंत सर्वात कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू म्हणून याकडे पाहिले जात आहे. यासह आणखी सहा मृत्यूची नोंद झाली. यात दोन तरुणांचाही समावेश आहे. आज १५० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या ३८३७ झाली, तर मृतांची संख्या ७६ वर पोहोचली. विदर्भातील अकोला जिल्ह्यात कालपर्यंत सर्वात कमी म्हणजे २१ वर्षीय मुलीच्या मृत्यूची नोंद होती. आता नागपुरात त्यापेक्षा कमी वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अमरावती येथील रहिवासी असलेला हा रुग्ण १५ दिवसापूर्वी नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागात भरती झाला होता. परंतु तीन दिवसानी स्वत:हून सुटी घेऊन परत गेला. काही दिवसानी पुन्हा तो मेडिकलमध्ये भरती झाला. आला तेव्हा त्याला क्वॉड्री पॅरालिसीस झाले होते. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी इन्ट्युबेटेड करण्यापूर्वी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता अहवाल पॉझिटिव्ह आला. आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा मृत्यू ६२ वर्षीय पुरुषाचा झाला. टेका येथील रहिवासी असलेला हा रुग्ण २३ जुलै रोजी मेडिकलमध्ये भरती झाला. न्यूमोनियासह इतरही आजार होते. आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसरी मृत व्यक्ती ६८वर्षीय पुरुष होती. आझाद कॉलनी मोठा ताजबाग येथील या रुग्णाला उच्चरक्तदाब, मधुमेहासह न्यूमोनिया झाला होता, आज पहाटे मृत्यू झाला. चौथा मृत्यू मेयोमध्ये झाला. ३६ वर्षीय महिलेला गंभीर स्थितीत रुग्णालयात आणले. उच्चरक्तदाब, मधुमेह व लठ्ठपणा होता. उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूनंतर अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. पाचवा मृत्यू ३४ वर्षीय युवकाचा झाला. कळमना येथील या रुग्णाला गंभीर स्थितीत २२ तारखेला मेयोमध्ये भरती केले. उपचार सुरू असतनाा आज सकाळी मृत्यू झाला, तर सहावा मृत्यू कामठी येथील ५० वर्षीय रुग्णाचा आहे.ग्रामीणमध्ये ४७ तर शहरात १०३ रुग्ण बाधितरॅपिड अ‍ॅण्टीजन तपासणीत पुन्हा ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले. या शिवाय मेयोच्या प्रयोगशाळेत ३१, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १३, एम्सच्या प्रयोगशाळेत १९, माफसूच्या प्रयोगशाळेत २५ असे एकूण १५० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ४७ रुग्ण ग्रामीण भागातील तर १०३ रुग्ण शहरी भागातील आहेत. आज ८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २३९२ झाली आहे.या वसाहतीत आढळून आलेबाधित रुग्ण आरोग्य विभागाकडे सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंद झालेल्या रुग्णांमध्ये पाचपावलीमधील ६, नारी २, पार्वतीनगर २, चंद्रनगर ९, रामटेकेनगर १, पाचनल चौक रामबाग १, कुकडे ले-आऊट ३, हावरापेठ २, मानेवाडा बेसा रोड १, अमरनगर १, उंटखाना १, अभिनव रेसिडन्सी अमरावती रोड ३, यशवंत स्टेडियम परिसर १, वसंतराव नाईक झोपडपट्टी २, डागा ले-आऊट २, राजीवनगर १, हिंदुस्तान कॉलनी रामनगर १, सिव्हील लाईन्स १, हनुमाननगर १, नागपूर जीएमसी १, अयोध्यानगर १, सोमवारी क्वॉर्टर ३, गोळीबार चौक १, भालदारपुरा १, महाल ३, इतवारी १, मोहननगर १, जरीपटका ३, मानकापूर १, पेन्शननगर १, मॉर्टीनगर १, चावला चौक ३, गोधनी २, आनंदनगर ४, झिंगाबाई टाकळी १, सूर्यनगर कळमना ५, गरोबा मैदान १, कळमना १, भांडेवाडी पारडी १, वर्धमाननगर १, भवानी मंदिर पारडी १, भवानीनगर पारडी १, भंडारा रोड १, छापरूनगर ३, धंतोली ४, लक्ष्मीनगर १, जयताळा २, त्रिमूर्तीनगर २, खापरी नाका ३, चिंचभवन १, सीताबर्डी २, भेंडे ले-आऊट इंद्रप्रस्थनगर १, खामला १, मेहंदीबाग १, शांतिनगर १, इतवारी १, न्यू मंगळवारी १, लकडगंज १, सक्करदरा १, गाडगेबाबानगर १, मोठा ताजबाग १, खरबी १, नंदनवन ३, भांडे प्लॉट येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.दैनिक संशयित :३०३बाधित रुग्ण : ३८३७घरी सोडलेले : २३९२उपचार घेत असलेले रुग्ण : १३६९मृत्यू : ७६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू