शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
3
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
4
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
5
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
6
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
7
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
8
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
9
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
10
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
11
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
12
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
14
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
15
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
16
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
17
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
18
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
19
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
20
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:28 IST

वाढत्या कोरोना संक्रमणाने जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात धडकी भरवली होती. परंतु, गेल्या दोन दिवसापासून कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देनागरिकांना दिलासा : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८२.२५ टक्के

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वाढत्या कोरोना संक्रमणाने जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात धडकी भरवली होती. परंतु, गेल्या दोन दिवसापासून कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी १,९९४ रुग्णांना कोरोनामुक्त घोषित करण्यात आले तर, १,३५० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. रविवारी १,६१० रुग्ण बरे झाले होते तर, १,२२६ नवीन रुग्ण मिळाले होते.जिल्ह्यातील रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ८२.२५ टक्के झाले आहे. जूनच्या शेवटपर्यंत हे प्रमाण ८२ टक्क्यांच्या घरात पोहचले होते. परंतु, त्यानंतर कोरोना संक्रमण वेगात वाढले व त्यासोबत रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण कमी झाले होते. सप्टेंबरमध्ये कोरोनामुक्तीची टक्केवारी पुन्हा वाढल्यामुळे समाजात दिलासादायक संकेत गेले आहेत. सोमवारी शहरातील १,७१७ तर, ग्रामीणमधील २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण ५३ हजार ५५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात शहरातील ४४ हजार १५ तर, ग्रामीणमधील ९ हजार ५३५ रुग्णांचा समावेश आहे. तसेच, अस्तित्वातील कोरोना रुग्णांची संख्या दीर्घ काळानंतर १० हजाराच्या खाली आहे. सोमवारी ९ हजार ४६३ (शहर-५,७६५, ग्रामीण-३,६९८) कोरोना रुग्ण अस्तित्वात होते. त्यातील ४ हजार २७९ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.  ४८ रुग्णांचा मृत्यूजिल्ह्यामध्ये सोमवारी १,३५० (शहर-१,०२३, ग्रामीण-३२२, इतर-५) नवीन कोरोना रुग्ण आढळून आले तर, ४८ (शहर-३५, ग्रामीण-८, इतर-५) कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण २,०९४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६५ हजार १०७ झाली आहे.  ३,८८८ नमुन्यांची चाचणीसोमवारी जिल्ह्यामधील ३,८८८ (शहर-२,७७२, ग्रामीण-१,११६) नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या १,०२७ पैकी ४०५ नमुने पॉझिटिव्ह आढळले. तसेच, एम्समध्ये ८७, मेडिकलमध्ये १६४, मेयोमध्ये ९८ तर, नीरीमध्ये १३९ नमुने पॉझिटिव्ह आले. १,४९५ नमुन्यांची अ‍ॅन्टिजेन चाचणी झाली. त्यातील ४५७ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. नमुन्यांची संख्या कमी झाल्याने सिव्हिल सर्जन डॉ. देवेंद्र पातुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आठवड्याच्या शेवटी नमुन्यांची तपासणी कमी होत असल्याची माहिती दिली.  मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून याविषयी माहिती मिळू शकली नाही.  अ‍ॅक्टिव्ह - ९,४६३स्वस्थ - ५३,५५०मृत्यू - २०९४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर