शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कहर सुरूच, २२०५ रुग्ण पॉझिटिव्ह, ३४ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 23:31 IST

कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालला आहे. मंगळवारी २२०५ नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णसंख्या ४३,२३७ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८५४, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्ण आहेत. आज ३४ रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्दे शहरातील २८५४, ग्रामीणमधील ३४९ रुग्ण : १८०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा कहर अधिकच वाढत चालला आहे. मंगळवारी २२०५ नव्या रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णसंख्या ४३,२३७ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २८५४, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्ण आहेत. आज ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूची संख्या १३९९ झाली आहे. विशेष म्हणजे, रोजच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असला तरी १८०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. आज दिवसभरात ८३०८ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३०५८ रुग्णांची आरटीपीसीआर तर ५२५० रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीतून ११४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे तर, आरटीपीसीआर चाचणीतून १०५६ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले आहे. खासगी लॅबमधून ४८७ रुग्णांची नोंद झाली. एम्सच्या प्रयोगशाळेतून ३३, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून १६८, मेयोच्या प्रयोगशाळेतून ३७१, माफसूच्या प्रयोगशाळेतून ७४ तर खासगी लॅबमधून ३१८ रुग्ण पॉझिटिव्ह आले.मृत्यूच्या संख्येत किंचित घटसोमवारी नागपूर जिल्ह्यात ५० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असताना मंगळवारी यात किंचित घट दिसून आली. ३४ रुग्णांचे मृत्यू झाले. यात २८ रुग्ण शहरातील, ४ रुग्ण ग्रामीणमधील तर दोन रुग्ण जिल्ह्याबाहेरील होते. शहरात आतापर्यंत एकूण १०७७, ग्रामीणमध्ये १९६ तर जिल्ह्याबाहेरील १२६ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.२३ टक्केआहे.रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्केनागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या कमालीची वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज १८०३ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ३०४४१ झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ७०.४५ टक्क्यांवर पोहचले आहे. शासकीयसह खासगी हॉस्पिटल व कोविड के अर सेंटरमध्ये ११३७७ रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ८३०८बाधित रुग्ण : ४३,२३७बरे झालेले : ३०४४१उपचार घेत असलेले रुग्ण : ११३७७मृत्यू :१३९९

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर