शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

CoronaVirus in Nagpur : नागपुरात ४७ दिवसानंतर मृत्यूची संख्या २२ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:30 IST

Corona virus,Death toll decrease, Nagpur News कोरोनबाधितांचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. ४७ दिवसानंतर पहिल्यांदाच मृत्यूसंख्या २२ वर आली. विशेष म्हणजे, आज ८७६ नव्या रुग्णांची भर पडली असली तरी याच्या दुप्पट रुग्ण बरे झाले.

ठळक मुद्दे८७६ रुग्णांची भर : नव्या रुग्णांच्या दुपटीने रुग्ण बरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनबाधितांचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. ४७ दिवसानंतर पहिल्यांदाच मृत्यूसंख्या २२ वर आली. विशेष म्हणजे, आज ८७६ नव्या रुग्णांची भर पडली असली तरी याच्या दुप्पट रुग्ण बरे झाले. १,८२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८२.८७ टक्क्यांवर गेले आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ८०,८४४ तर मृतांची संख्या २,५९६ झाली आहे.जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा कहर दिसून आला. परंतु मागील सात दिवसांत रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला. १५ आॅगस्ट रोजी १४ मृत्यूची नोंद होती. त्यानंतर मृत्यूची सर्वाधिक नोंद सप्टेंबर महिन्यात झाली. एकाच दिवशी ६४ रुग्णांचे बळी गेले होते. परंतु दीड महिन्यानंतर आता मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आहे.चाचण्यांची संख्या रोडावलेलीचकोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी होणे व बाधितांना उपचाराखाली आणणे गरजेचे आहे. मात्र चाचण्यांची संख्या रोडावल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शनिवारी ५,४५२ चाचण्या झाल्या. यात ३,३८८ आरटीपीसीआर तर २,०६४ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६६४, ग्रामीणमधील २२१ तर जिल्ह्याबाहेरील एक रुग्ण आहे. मृतांमध्ये शहरातील १७, ग्रामीणमधील चार तर जिल्ह्याबाहेरील एक आहे.कोरोनाचे ४,०४० रुग्ण उपचाराखालीतीन शासकीय रुग्णालयांसह, कोविड केअर सेंटर व खासगी हॉस्पिटलमध्ये सध्याच्या स्थितीत ४,०४० रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ७,२१० रुग्ण गृह विलगीकरण म्हणजे होम आयसोलेशनमध्ये आहेत. एकूण ११,२५० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज खासगी लॅबमधून ४०० रुग्ण, अ‍ॅन्टिजेन चाचणीतून २२७ तर मेयो, मेडिकल, एम्स, माफसू, नीरी व विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून केवळ २४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ५,४५२बाधित रुग्ण : ८०,८४४बरे झालेले : ६६,९९८उपचार घेत असलेले रुग्ण : ११,२५०मृत्यू : २,५९६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू