शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

CoronaVirus in Nagpur : कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट, ६६ दिवसांनी ५०० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 22:25 IST

Corona Virus Blast Again कोरोनाबाबत वाढलेली बेफिकरी, कमी झालेला मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा व सॅनिटायझरचा कमी झालेल्या वापरामुळे मागील चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडली. गुरुवारी रुग्णसंख्येत तब्बल ५०० नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला.

ठळक मुद्दे संसर्गाचा वेग वाढतोय! : चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर

 लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : कोरोनाबाबत वाढलेली बेफिकरी, कमी झालेला मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा व सॅनिटायझरचा कमी झालेल्या वापरामुळे मागील चार दिवसांत १३९८ नव्या रुग्णांची भर पडली. गुरुवारी रुग्णसंख्येत तब्बल ५०० नव्या रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला. बाधितांची एकूण संख्या १३७४९८ झाली असून आज ५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२१५ वर पोहोचली.

केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच नागपूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यात वाढत्या रुग्णसंख्येला घेऊन चिंता व्यक्त केली होती. त्यांनी कमी झालेल्या चाचण्या वाढविण्याच्या व बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे ट्रेसिंग वाढवून त्यांची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. परिणामी, मागील दोन दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. आज नागपूर जिल्ह्यात ५०८५ संशयितांच्या चाचण्या झाल्या. यात ४०२२ आरटीपीसीआर तर १०६३ रॅपीड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीआरमधून ४५७ तर अँटिजनमधून ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या रुग्णामंध्ये शहरातील ४४५, ग्रामीणमधील ५३, तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. मृतांमध्ये आज शहरातील २, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचे बळी गेले. २१६ रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १२९७३६ झाली आहे. ३५४७ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

 ५ डिसेंबर रोजी होती ५२७ रुग्णांची नोंद

नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात दैनंदिन रुग्णांची संख्या ५०० वर गेली होती. सप्टेंबर महिन्यात त्यात वाढ होऊन २००० वर पोहोचली; परंतु ऑक्टोबरपासून त्यात घट होऊ लागली होती. १७ ऑक्टोबर रोजी ५४० रुग्णसंख्येच्या नोंदीनंतर १ डिसेंबर रोजी ५१५, ३ डिसेंबर रोजी ५३६, तर ५ डिसेंबर रोजी ५२७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल ६६ दिवसांनी आज बाधितांची संख्या ५०० झाली.

मागील पाच महिन्यांतील रुग्णसंख्येचा उच्चांक

१७ ऑक्टोबर ५४०

१ डिसेंबर ५१५

३ डिसेंबर ५३६

५ डिसेंबर ५२७

११ फेब्रुवारी ५००

दैनिक चाचण्या : ५०८५

बाधित रुग्ण : १३७४९८

बरे झालेले : १२९७३६

 उपचार घेत असलेले रुग्ण : ३५४७

 मृत्यू : ४२१५

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर