शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : धारावी येथून दहेगावात पोहचला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 23:41 IST

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईच्या धारावी येथून कोरोनाचा विषाणू नागपूरजवळील कोरोडी रोडवरील दहेगाव (रंगारी) येथे पोहचला. २५ वर्षीय पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण एका ट्रकमध्ये लपून आपल्या गावी आला. परंतु घरच्यांनी प्रवेश नाकारल्याने मेयोत दाखल झाला. या रुग्णासह पहिल्यांदाच बुटीबोरी येथेही दोन रुग्णाची नोंद झाली.

ठळक मुद्देसहा रुग्णांची नोंद : पहिल्यांदाच बुटीबोरी व टेका येथील रुग्ण पॉझिटिव्ह : भिकारीही कोरोनाबाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईच्या धारावी येथून कोरोनाचा विषाणू नागपूरजवळील कोरोडी रोडवरील दहेगाव (रंगारी) येथे पोहचला. २५ वर्षीय पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण एका ट्रकमध्ये लपून आपल्या गावी आला. परंतु घरच्यांनी प्रवेश नाकारल्याने मेयोत दाखल झाला. या रुग्णासह पहिल्यांदाच बुटीबोरी येथेही दोन रुग्णाची नोंद झाली. हे बापलेक असून मुलगा मुंबईवरून आला होता. तर प्रथमच उत्तर नागपुरातील टेका येथील एका गर्भवतीची नोंद झाली. या तिन्ही वसाहती कोरोनासाठी नव्या असल्याने व सीए रोडवरील एका भिकाऱ्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज सहा रुग्णांची नोंद होऊन रुग्णांची संख्या ४१६ वर पोहचली आहे. धारावी येथील एका सलूनमध्ये काम करणारा हा युवक १७ मे रोजी गावी पोहचला. दहेगाव येथून पांजार स्थित मॉडर्न स्कूल परिसरात राहणाऱ्या कुणा ओळखीच्या घरी गेला. येथे आठ लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. या युवकाच्या संदर्भात कोराडी ठाण्यात पोलीस हेल्पलाईन नंबरवरून सूचना देण्यात आली होती. परंतु कुणी सहकार्य केले नाही. यामुळे रात्री १ वाजता ट्रकमध्ये बसवून दहेगाव येथे रवाना केले. सांगण्यात येते की, दहेगाव बस थांब्यावर रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांना भेटला. दोन दिवस मित्रांसोबत राहिला. पिपळा, चनकापूर व खापरखेडा परिसरात फिरला. दारूच्या नशेत तो पडल्याने गावातील काही लोकांनी त्याला १९ मे रोजी मेडिकलला पाठविले. तेथून आल्यावर त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले. २१ मे रोजी जेव्हा त्याची प्रकृती खालावली तेव्हा सावनेर तहसीलच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. याच्या कुटुंबातील सात लोकांसह एकूण १८ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.-बुटीबोरी येथील बापलेक पॉझिटिव्ह मुंबई येथून २७ वर्षीय मुलगा १६ मे रोजी बुटीबोरी येथे आपल्या घरी आला. सात दिवसानंतर त्याला ताप, सर्दी व घशात इन्फेक्शन झाले. त्याचे ५२ वर्षीय वडिलांनाही अस्थमा व उच्चरक्तदाबाचा त्रास वाढला. यामुळे आज दोघेही मिहान येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) आले. दोघांची लक्षणे पाहून येथील डॉक्टरांनी संशयित म्हणून नमुने घेतले. नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला ‘एम्स’मध्ये भरती करून घेतले. प्रथमच बुटीबोरी येथे रुग्णाची नोंद झाल्याने येथील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांच्या घरातील सदस्यांसह इतरही काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.‘एम्स’मध्ये पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारनागपुरात कोरोनाबाधितांवर केवळ मेयो, मेडिकलमध्येच उपचार सुरू होते. परंतु आता ‘एम्स’नेही कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या बापलेकाला कोविड वॉर्डात भरती केले. या वॉर्डात कोविड रुग्णांसाठी १६ खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एम्सच्या संचालक, मेजर जनरल डॉ. विभा दत्ता म्हणाल्या, पायाभूत सोयींचे काम सुरू असल्याने तूर्तास तरी १६ खाटांचा वॉर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोविड विषाणू चाचणीसाठी आणखी एक यंत्र दाखल झाले असून ते स्थापन केले जात आहे.भिकारी पॉझिटिव्हधोकादायक सीए रोडवर पडून असलेल्या एका भिकाºयाची प्रकृती खालावल्याने एका पोलीस कर्मचाºयाने चार दिवसापूर्वी मेयोत दाखल केले. त्याने पॅन्टमध्ये संडास केली होती. डॉ. रणजित यादव यांनी कर्मचाºयांच्या मदतीने त्याची सफाई करून औषधोपचाराला सुरुवात केली. शुक्रवारी त्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला असता तो पॉझिटिव्ह आला. एखाद्या भिकाºयाचा नमुना पॉझिटिव्ह येणे हे धोकादायक असल्याचे वरिष्ठ डॉक्टरांचे मत आहे. त्यांच्यानुसार त्या परिसरात बाधित रुग्ण असावे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

कोलकाता येथील महिला पॉझिटिव्हमुंबई येथून कोलकाता येथे बसने प्रवास करणाऱ्या ३८ आठवडे पूर्ण झालेल्या २२ वर्षीय गर्भवतीच्या पोटात दुखू लागल्याने तातडीने नागपुरला बस आणण्यात आली. दुपारी ३.३०वाजता मेडिकलमध्ये तिची प्रसुती झाली. तिला अडीच किलोची मुलगी झाली. प्रसूत महिलेच्या चाचणीचा अहवाला रात्री पॉझिटव्ह आला. विशेष म्हणजे ती महिला ज्या बसमध्ये प्रवास करीत होती त्यात २५ प्रवासी आहेत. याची माहिती मेडिकल प्रशासनाने मनपाला दिली.आठ महिन्याची गर्भवती पॉझिटिव्हउत्तर नागपुरात कमाल चौकपर्यंतच कोरोनाचा प्रादुर्भाव होता. परंतु आता तो टेकापर्यंत पोहचला आहे. आठ महिन्याची गर्भवती असलेली ही २८ वर्षीय महिला तपासणीसाठी शुक्रवारी मेयो रुग्णालयात आली. नियमानुसार तिचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. गर्भवतीच्या घरातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.१४ रुग्ण कोरोनामुक्तमेयो, मेडिकलमधून १४ रुग्णांना सुटी देण्यात आली. मेयोमधील गोळीबार चौक येथील एक, सतरंजीपुरा येथील एक, टिमकी येथील सहा तर हंसापुरी येथील चार असे १२ रुग्णांना सुटी देण्यात आली. मेडिकलमधील शताब्दीनगर चौक येथील २८वर्षीय तर पार्वतीनगर येथून २४ वर्षीय पुरुष असे दोघांना सुटी देण्यात आली. नागपुरात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३३६ झाली आहे.मुंबई येथून कोलकाताला जाणाऱ्या स्त्रीची मेडिकलमध्ये प्रसुतीमुंबई येथून कोलकाता येथे बसने प्रवास करणाऱ्या ३८ आठवडे पूर्ण झालेल्या २२ वर्षीय गर्भवतीच्या पोटात दुखू लागल्याने तातडीने नागपूरला बस आणण्यात आली. मेडिकलमध्ये तिची प्रसुती झाली. तिला अडीच किलोची मुलगी झाली. तिच्या सोबत तिचा पती असून दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १८८दैनिक तपासणी नमुने १७१दैनिक निगेटिव्ह नमुने १६५नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४१६नागपुरातील मृत्यू ०७डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३३६डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २३५७क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १७८४पीडित-४१६-दुरुस्त-३३६-मृत्यू-७

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर