शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : कोरोना रुग्णसंख्येचा जुना विक्रम मोडीत ; २,५८७ रुग्णसंख्येचा उच्चांक, १८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 22:53 IST

Corona Virus , Nagpur news कोरोनाच्या दुसरी लाट अधिक धाकधूक वाढविणारी आहे. कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येने १३ सप्टेंबर रोजीच्या २३४३ रुग्णसंख्येचा जुना विक्रम मंगळवारी मोडीत काढला. तब्बल २५८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातच पाच महिन्यांतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १८ झाली.

ठळक मुद्दे कोरोनाची गंभीर स्थिती

 लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : कोरोनाच्या दुसरी लाट अधिक धाकधूक वाढविणारी आहे. कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येने १३ सप्टेंबर रोजीच्या २३४३ रुग्णसंख्येचा जुना विक्रम मंगळवारी मोडीत काढला. तब्बल २५८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यातच पाच महिन्यांतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १८ झाली. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने विशेषत: शहरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १,७५,३८६, तर मृतांची संख्या ४,४८९ वर पोहचली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भावाला मार्च महिन्यापासून सुरुवात झाली. सप्टेंबर २०२०मध्ये कोरोनाचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होऊ लागली. नोव्हेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या ५०पर्यंत आली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. २४ फेब्रुवारीपासून ते १२ मार्चपर्यंत सलग १७ दिवस बाधितांची संख्या हजारांवर गेली होती, तर, १३ ते १६ मार्च दरम्यान दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांवर पोहोचली. सध्या रुग्णवाढीचा दर १.४७ टक्के आहे. मृत्युदर ०.४० टक्के आहे. शहरात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असलीतरी पुढील काही दिवसांत रुग्ण वाढण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहे.

 शहरात १९२१, तर ग्रामीणमध्ये ६६४ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी १३,३६४ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातून शहरातील १,९२१, तर ग्रामीणमधील ६६४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. जिल्हाबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील १२, ग्रामीणमधील चार, तर जिल्हाबाहेरील दोन रुग्णांचे मृत्यू झाले. शहरात रुग्णांची एकूण संख्या १,४०,१७१ व मृत्यूची संख्या २,८८६ झाली. ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या ३४२३१ झाली असून, ८०१ रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.

१८,९८० कोरोनाचे सक्रिय रुग्ण

कोरोनाचा या बारा महिन्यांच्या काळात पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या १८,९८० झाली आहे. यात शहरातील १५,५०९, तर ग्रामीणभागातील ३,४७१ रुग्ण आहेत. होमआयसोलेशनमध्ये १३,८६२ रुग्ण आहेत. शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात व कोविड केअर सेंटरमध्ये ५११८ रुग्ण उपचाराखाली आहेत. मंगळवारी १०९५ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दरातही घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुक्त रुग्णांचा दर ९४ टक्के होता मंगळवारी तो ८६.६२ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत १,५१,९१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पाच दिवसांत ११,३५४ नवे रुग्ण व ६४ मृत्यूची भर

सप्टेंबर महिन्यात दहा हजार रुग्ण गाठण्यास साधारण ८ ते १० दिवस लागायचे. परंतु मागील पाच दिवसांतच १० हजारांचा टप्पा ओलांडण्यात आला. ११,३५४ रुग्ण, तर, ६४ मृत्यूची भर पडली.

कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १३,३६४

ए. बाधित रुग्ण :१,७५,३८६

सक्रिय रुग्ण : १८,९८०

बरे झालेले रुग्ण : १,५१,९१७

 मृत्यू : ४४८९

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर