शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

CoronaVirus in Nagpur : नागपुरात आणखी ४२ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 10:56 PM

‘मिशन बिगीन’च्या तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर, दुकानात, कार्यालयात वर्दळ वाढली असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या पाच दिवसांत १५४ रुग्णांची नोंद झाली आहे. यात आज ४२ रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ७८१ वर पोहचली आहे. मार्टिननगर, शिवाजीनगरसारख्या वसाहतीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या ७८१ : शिवाजीनगर, मार्टिननगर वसाहतीत रुग्णाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मिशन बिगीन’च्या तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर, दुकानात, कार्यालयात वर्दळ वाढली असताना दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या पाच दिवसांत १५४ रुग्णांची नोंद झाली आहे. यात आज ४२ रुग्णांची भर पडली. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ७८१ वर पोहचली आहे. मार्टिननगर, शिवाजीनगरसारख्या वसाहतीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला आहे.मेयोच्या प्रयोगशाळेतून आज ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात पहिल्यांदाच जरीपटका येथील मार्टिननगर येथे रुग्णाची नोंद झाली. नाईक तलाव व बांगलादेश येथील सात रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर हिंगण्यामधून आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेतून ३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नाईक तलाव, बांगलादेश येथून २२ तर हंसापुरी येथील चार रुग्णांचा समावेश आहे. याच प्रयोशाळेतून उर्वरित सहा रुग्णांचे नमुने रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. यामळे वसाहतींची नावे माहिती होऊ शकली नाहीत.खासगी लॅबमधून युवती पॉझिटिव्हशिवाजीनगर येथील २८ वर्षीय युवतीला गेल्या काही दिवसांपासून न्युमोनियाची लक्षणे होती. एका खासगी हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर डॉक्टरांनी कोविडची तपासणी करण्यास सांगितले. यात ही युवती पॉझिटिव्ह आली आहे. या युवतीला मेडिकलमध्ये रात्री उशिरा दाखल करण्यात आले. पॉश वसाहत म्हणून ओळख असलेल्या शिवाजीनगरातून पहिल्यांदा रुग्णाची नोंद झाली. -नाईक तलाव,बांगलादेश वसाहतीतून पुन्हा २९ रुग्णसतरंजीपुरानंतर मोमिनपुरा तर आता नाईक तलाव व बांगलादेश येथून सर्वाधिक रुग्णांची नोंद होत आहे. आज २९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत या वसाहतीतून ९० रुग्णांची नोंद झाली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या या दोन्ही वसाहतीतून गेल्या चार दिवसांत ४००वर नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगण्यात येते.पाच दिवसात १५४ रुग्णांची नोंदगेल्या पाच दिवसात दीडशेवर रुग्णांची नोंद झाली. ५ जून रोजी ५६, ६ जून रोजी १०, ७ जून रोजी १५, ८ जून रोजी ३१ तर ९ जून रोजी ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.५२१ रुग्ण रुग्णालयातून घरीकोविड विषाणूच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ७८१ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ५२१ रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतले. यात आज २८ रुग्णांची भर पडली. मेयोमधून ११ तर मेडिकलमधून १७ रुग्णांना ‘डिस्चार्ज’ म्हणजे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात मोमिनपुरा येथील आठ तर, तीन रुग्ण गोळीबार चौक परिसरातील आहेत. हे सर्व रुग्ण मेयो येथे भरती होते. मेडिकलमध्ये उपचारानंतर सुटी देण्यात आलेल्यांमध्ये नाईक तलाव येथील पाच, कोरोडी येथील तीन, मोमिनपुरा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. यांना पुढील १४ दिवस ‘होम आयसोलेशन’मध्ये राहायचे आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १३२दैनिक तपासणी नमुने ६५७दैनिक निगेटिव्ह नमुने ६१६नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ७८१नागपुरातील मृत्यू १५डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५२१डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३१९०क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १८५०पीडित- ७८१-दुरुस्त-५२१-मृत्यू-१५

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर