शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : कोरोनाबाधितांमध्ये ४१८ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 21:44 IST

Corona Virus सोमवारी ३०० च्या खाली आलेली कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी ४१८ वर पोहचली. चाचण्यांचा संख्येतही ६ हजाराने वाढ झाली.

ठळक मुद्दे९ मृत्यू : ६१६२ चाचण्या : ३७४ रुग्ण बरे

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : सोमवारी ३०० च्या खाली आलेली कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी ४१८ वर पोहचली. चाचण्यांचा संख्येतही ६ हजाराने वाढ झाली. आज ९ रुग्णांचा जीव गेला. बाधितांची एकूण संख्या ११७९११ तर मृतांची संख्या ३८१३ झाली. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत आज कमी, ३७४ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९१.८७ टक्क्यांवर गेले आहे.

थंडी वाढू लागली आहे. परंतु रुग्णांची संख्या ४०० ते ५०० दरम्यान कायम आहे. मागील पाच दिवसांत, ११ डिसेंबर रोजी ३९८, १२ डिसेंबर रोजी ३७६, १३ डिसेंबर रोजी ३०० तर १४ डिसेंबर रोजी २८२ रुग्ण आढळून आले. मंगळवारी मात्र चाचण्यांची संख्या वाढताच रुग्णसंख्याही ४००वर गेली. आज ४७१४ आरटीपीसीआर तर १४४८ रॅपीड अँटिजेन असे एकूण ६१६२ चाचण्या झाल्या. यात अँटिजेन चाचणीतून ५८ तर आरटीपीसीआर चाचणीतून ३६० रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरातील ३३८, ग्रामीण भागातील ७६ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील १ तर जिल्हाबाहेरील ४ आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७७४ झाली आहे. यातील १४४९ रुग्ण रुग्णालयात तर ४३२५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.

 ३० कोविड रुग्णालयात रुग्णच नाहीत

नागपूर जिल्ह्यात ९१ खासगी कोविड रुग्णालयांपैकी ३० कोविड रुग्णालयात रुग्णच नाहीत. ३५वर रुग्णालयात १० च्या आत रुग्ण आहेत. पुढील आदेशापर्यंत कोविड खाटा रिकाम्या ठेवण्याचा प्रशासनाच्या सूचना आहेत. यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या मेडिकलमध्ये सर्वाधिक १७६, मेयोमध्ये ६० तर एम्समध्ये ३१ रुग्ण उपचाराखाली आहेत.

दैनिक संशयित : ६१६२

बाधित रुग्ण : ११७९११

बरे झालेले : १०८३२४

उपचार घेत असलेले रुग्ण : ५७७४

 मृत्यू : ३८१३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर