शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus in Nagpur : नागपुरात २८ दिवसांत २० हजार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 22:47 IST

कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे. शुक्रवारी १३२९ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२ रुग्णांचे मृत्यू झाले.

ठळक मुद्दे१३२९ नव्या रुग्णांची भर : ४२ रुग्णांचा मृत्यू : शहरात ७१५ तर ग्रामीणमध्ये १३८ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. गेल्या २८ दिवसात रुग्णांची संख्या २० हजारांवर गेली आहे. शुक्रवारी १३२९ नव्या रुग्णांची भर पडली असून ४२ रुग्णांचे मृत्यू झाले. रोजच्या रुग्णसंख्येत ही मोठी वाढ आहे. बाधितांची एकूण संख्या २६०९४ तर मृतांची संख्या ९४६ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १०७६, ग्रामीण भागातील २५० तर जिल्हाबाहेरील तीन रुग्ण आहेत. समाधानकारक बाब म्हणजे, आतापर्यंत १५८५५ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ६०.७६ टक्क्यांवर गेले आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णांची संख्या हजारावर जात आहे. आज नागपूर जिल्ह्यात २८२८ आरटी पीसीआर चाचणी तर ४७७५ रॅपिड अ‍ॅन्टिजन असे एकूण ७६०३ चाचण्या करण्यात आल्या. अ‍ॅन्टिजन चाचणीत ६३२ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४१४३ रुग्ण निगेटिव्ह आले. खासगी लॅबमध्ये ४३६ रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाले. या शिवाय, एम्समध्ये करण्यात येत असलेल्या आरटीपीसीआर चाचणीत २२, मेडिकलमध्ये ११२, मेयोमध्ये ३३, माफसूमध्ये ७६, नीरीमध्ये १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज १०९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.या महिन्यात ८२० रुग्णांचा मृत्यूया महिन्यात तब्बल ८२० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.६२ टक्के मृत्यू झाले आहेत. आज मृतांमध्ये शहरातील ३४, ग्रामीणमधील पाच तर जिल्हाबाहेरील तीन आहेत. एकूण मृतांमध्ये शहरातील ७१५, ग्रामीण भागातील १३८ तर जिल्हाबाहेरील ९३ मृत्यू आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आतापर्यंत ३९६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४५८, एम्समध्ये १, वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ८, रेडिएन्स हॉस्पिटलमध्ये २८, सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये ९, होप हॉस्पिटलमध्ये २६, लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये १०, एसएमएचआरसी हॉस्पिटलमध्ये ५, आशा हॉस्पिटलमध्ये ४, हिंगणा वानाडोंगरी येथील सीसीसीमध्ये १ असे एकूण ९४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.गृह अलगीकरण कक्षात ५७६३ रुग्णलक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह रुग्ण कोविड केअर हॉस्पिटलमध्ये न राहता होम आयसालेशन म्हणजे गृह अलगिकरण कक्षात राहण्याला प्राधान्य देत आहेत. सध्याच्या स्थितीत ५७६३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयात ९२९३ रुग्ण उपचार घेत आहेत.दैनिक संशयित : ७६०३बाधित रुग्ण : २६०९४बरे झालेले : १४७६३उपचार घेत असलेले रुग्ण : ९०९८मृत्यू :९०४

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर