शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १४४ रुग्ण पॉझिटिव्ह, पाच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 22:47 IST

कोरोनाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होऊ पाहत आहे. जुलै महिन्यात पाचव्यांदा रोजच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली, तर गेल्या नऊ दिवसांपासून मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी १४४ रुग्ण पॉझिटिव्ह व पाच मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३,१७१ झाली असून मृतांची संख्या ६० वर पोहचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होऊ पाहत आहे. जुलै महिन्यात पाचव्यांदा रोजच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली, तर गेल्या नऊ दिवसांपासून मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी १४४ रुग्ण पॉझिटिव्ह व पाच मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३,१७१ झाली असून मृतांची संख्या ६० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत आज खासगी लॅबमधून सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या चढत्या आलेखावर आरोग्य क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये २६, मेडिकलच्या प्रयोगशाळेत दोन, एम्सच्या प्रयोगशाळेत ३५, नीरीच्या प्रयोगशाळेत २९, खासगी प्रयोगशाळेत ४९, रॅपिड अ‍ॅण्टिजेन चाचणीत तीन असे एकूण १४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी लॅबमध्ये वाढत असलेले रुग्ण आरोग्य यंत्रणेचे काम वाढविणारे ठरणार आहे. सध्या मेयोमध्ये २२९, मेडिकलमध्ये २४९, एम्समध्ये ५०, कामठी रुग्णालयात २२, खासगी हॉस्पिटलमध्ये २८, आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये ३२७, मध्यवर्ती कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये १२४ या शिवाय, १०३ रुग्ण भरतीच्या प्रक्रियेत असल्याने एकूण १,१३२ रुग्ण उपचार घेत आहेत. आज ४२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १९८१ झाली आहे. आज मृत्यूची नोंद झालेल्यांमध्ये कामठी येथील ५१ वर्षीय पुरुष, कन्हान येथील ४५ वर्षीय पुरुष, त्रिमूर्तीनगर येथील ४० वर्षीय पुरुष, नंदनवन येथील एक पुरुष तर एकाचा मृत्यू रविवारी झाल्यानंतर आज त्याची नोंद घेण्यात आली.कामठी तालुक्यात २७ पॉझिटिव्हकामठी तालुक्यात २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या २३१ झाली असून येथील ६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सावनेर तालुक्यातील डफई येथील ३२ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. पाटणसावंगीत पाच वेकोलि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. बुटीबोरी परिसरात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले.हे दोघेही नागपूर येथील कॅन्सर रुग्णालयात कर्मचारी म्हणून कामाला आहेत. बुटीबोरीतील कोरोनाबाधितांची संख्या आता सातवर गेली आहे. वाडीतील तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णसंख्या २४ झाली आहे. सावनेर तालुक्यातील खापा येथे सैनिकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोराडीत चार रुग्णांची भर पडली. नागपूर ग्रामीणमध्ये आज ४३ रुग्णांची नोंद झाली आहे.संशयित : ३,१३२बाधित रुग्ण : ३,१७१घरी सोडलेले : १,९८१उपचार घेत असलेले रुग्ण : १,१३२मृत्यू : ६०

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर