शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १२ मृत्यू, २,८१९ कोरोनाबाधित आले कुठून : रुग्ण व मृत्यूसंख्येतील घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:19 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध माहितीच्या आधारे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल २,८१९ रुग्णांचा व १२ मृतांचा फरक आहे. जाणीवपूर्वक रोजचे रुग्ण व मृतांची संख्या कमी दाखविण्याचा हा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्दे१,१२६ नव्या रुग्णांची भर तर ४४ मृत्यूची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध माहितीच्या आधारे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावल्याचे दिसून येत आहे. मात्र, बुधवार आणि गुरुवारच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल २,८१९ रुग्णांचा व १२ मृतांचा फरक आहे. जाणीवपूर्वक रोजचे रुग्ण व मृतांची संख्या कमी दाखविण्याचा हा प्रकार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नागपूर जिल्ह्यातील २३ सप्टेंबर रोजी एकूण रुग्णसंख्या ६७,६७१ तर मृतांची संख्या २,२०५ होती. आज यात १,१२६ नव्या रुग्णांची तर ४४ मृत्यूची भर पडली. त्यानुसार रुग्णसंख्या ६८,७९७ व मृतांची संख्या २,२४९ होणे अपेक्षित होते. परंतु आज रुग्णांची एकूण संख्या ७१,६१६ तर मृतांची संख्या २,२६१ वर पोहचली. विशेष म्हणजे, रुग्णसंख्येतील घोळ मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांच्या आकडेवारीत एकसूत्रता नसल्याच्या तक्रारी असतानाही वेळीच याकडे लक्ष देण्यात आले नाही. यामुळे आता कोरोनाच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे.१,५०६ रुग्ण बरेपॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज १,५०६ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५३,४१८ झाली आहे. या संख्येतही घोळ झाल्याने टक्के वारी ८० वरून ७४.५९ वर आली आहे. सध्या १५,९३७ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.८,३०६ चाचण्यांमधून ७,१८० निगेटिव्हजिल्ह्यात शहरामध्ये १,३९५ तर ग्रामीणमध्ये ३,६८० असे एकूण ५,०७५ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. शहरामध्ये १,९०३ तर ग्रामीणमध्ये १,३२८ असे एकूण ३,२३१ रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्या झाल्या. दोन्ही मिळून ८,३०६ चाचण्यांतून ७,१८० चाचण्या निगेटिव्ह आल्या. कोरोनाच्या आतापर्यंतच्या कालावधीत हे पहिल्यांदाच झाले आहे.रुग्ण दुपटीचा दर २९.१ दिवसांवररुग्ण दुपटीचा दर २९.१ दिवसांवर आला आहे. आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. गुरुवारी सर्वाधिक रुग्णाची नोंद मनपाच्या लक्ष्मीनगर झोनमध्ये झाली. १२८ बाधित आढळून आले. धरमपेठ झोनमध्ये ९८, हनुमाननगर झोनमध्ये १२२, धंतोली झोनमध्ये ७५, नेहरुनगर झोनमध्ये ८१, गांधीबाग झोनमध्ये ६०, सतरंजीपुरा झोनमध्ये ३२, लकडगंज झोनमध्ये ७०, आशीनगर झोनमध्ये ७४ तर मंगळवारी झोनमध्ये ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आले.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,३६५बाधित रुग्ण : ७१,६१६बरे झालेले : ५३,४१८उपचार घेत असलेले रुग्ण : १५,९३७मृत्यू : २,२६१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर