शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : गायिका कनिका कपूर प्रकरणाची झळ : खासदार तुमाने सेल्फ आयसोलेशनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 01:03 IST

गायिका कनिका कपूर प्रकरणाची झळ नागपूरपर्यंत पोहोचली आहे. खासदार तुमाने यांनी जनहितार्थ स्वत:ला ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ते १४ दिवसांपर्यंत खरीच ‘होम क्वॉरंटाईन’ राहतील.

ठळक मुद्देदुष्यंत सिंहसोबत बैठकीत होते : जनहितार्थ निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गायिका कनिका कपूर प्रकरणाची झळ नागपूरपर्यंत पोहोचली आहे. कनिकाच्या कार्यक्रमात सामील झालेले खासदार दुष्यंत सिंह ज्या खासदारांच्या संपर्कात आले, त्यात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचाही समावेश आहे. दुष्यंत यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीही खबरदारी म्हणून खासदार तुमाने यांनी जनहितार्थ स्वत:ला ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ते १४ दिवसांपर्यंत खरीच ‘होम क्वॉरंटाईन’ राहतील.खा. तुमाने यांनी सांगितले की, ते संसदीय कमिटीच्या त्या बैठकीत सहभागी झाले होते ज्या बैठकीत खा. दुष्यंत सिंहसुद्धा होते. कनिका कपूर या कोरोना विषाणू पॉझिटिव्ह आल्यानंतर ही बाब उघडकीस आली की, त्यांच्या कार्यक्रमात खा. दुष्यंत सिंह हेसुद्धा उपस्थित होते. संसदीय कमिटीच्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रयान यांनी ही माहिती मिळताच स्वत:ला ‘आयसोलेट’ करून घेतले. त्याचप्रकारे खा. तुमाने यांनीसुद्धा ‘सेल्फ आयसोलेशन’मध्ये राहण्याचा निर्णय घेतला.मुख्यमंत्र्यांना दिली माहितीखा. तुमाने यांनी स्वत: ‘सेल्फ आयसोलेशन’ची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करीत त्यांना स्वत:ची काळजी घेण्यास सांगितल्याची माहितीही खा. तुमाने यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKrupal Tumaneकृपाल तुमाने