शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोना संशयितांचेही जपले जात आहे मानसिक आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:06 IST

लोणारा, आमदार निवास, रविभवन, सिम्बॉयसिस, वनामती येथील संशयितांचे समुपदेशन करून मानसिक आरोग्य जपले जात आहे.

ठळक मुद्देमनोचिकित्सकांकडून समुपदेशन : प्रशासनाकडून घेतली जात आहे काळजी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूची भीती, लोकांचा या आजारातील बाधित व संशयित रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, रुग्णांमध्ये निर्माण होणारे गैरसमज, यातून वाढणारा ताण, नैराश्य यामुळे मानसिक आरोग्य ढासळू नये यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष लक्ष दिले जात आहे. लोणारा, आमदार निवास, रविभवन, सिम्बॉयसिस, वनामती येथील संशयितांचे समुपदेशन करून मानसिक आरोग्य जपले जात आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न केले जात आहे. प्रतिबंधात्मक उपायपासून ते या आजारातून रुग्ण बरे होतात याची माहिती दिली जात आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या, सोशल मीडियावर भयभीत करणारे व्हिडीओ, चुकीची माहिती आदींमुळे कोरोनाबाधित संशयित व बाधित रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहिसा बदललेला आहे. यातच अकोल्यातील सर्वाेपचार रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका रुग्णाने आत्महत्या केल्याचा प्रकारही सामोर आला आहे. हा धोका लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच नागपुरातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. यात प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर सायकॅट्रिक सोसायटी व काही सामाजिक संस्था मदत करीत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मनोचिकित्सक डॉ. प्रवीण नवखरे यांनी सांगितले, संस्थात्मक अलगीकरण कक्षातील संशयित लोकांचे समुपदेशन करताना या आजाराची, उपचाराची माहिती दिली जाते. या आजारातून तुम्हीसुद्धा बरे होऊ शकता, असा आत्मविश्वास त्यांच्यात जागविला जातो. त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. दिवसभरात काय करायला हवे, काय नको याचीही माहिती दिली जाते. याचा फायदा होताना दिसून येत असल्याचे डॉ. नवखरे यांंनी सांगितले. अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्नहोम क्वारंटाइन असताना येणाऱ्या मानसिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागपूर सायकॅट्रिक सोसायटीच्या डॉक्टरांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा लाभ नागरिक घेत आहेत. तीन अलगीकरण कक्षात मनोचिकित्सकाडूनही समुपदेशन केले जात आहे. अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

-रवींद्र ठाकरे जिल्हधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर