शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा संशयित रुग्ण निगेटिव्ह : नागपूर विमानतळावर २६४ प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 23:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमनातळावर दोहा आणि शारजाह येथून आलेल्या २६४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात एकही प्रवासी संशयित आढळला नाही. यामुळे हळूहळू कोरोना विषाणूची दहशत कमी होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमेयोमध्ये ३४ नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमध्ये रविवारी भरती करण्यात आलेल्या कोरोना संशयित चंद्रपूर येथील २४ वर्षीय रुग्णाचे नमुने सोमवारी ‘निगेटिव्ह’ आले. आतापर्यंत मेडिकलमध्ये दाखल झालेल्या सातही संशयित रुग्णांना हा विषाणू नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमनातळावर दोहा आणि शारजाह येथून आलेल्या २६४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यातही एकही प्रवासी संशयित आढळला नाही. यामुळे हळूहळू कोरोना विषाणूची दहशत कमी होत असल्याचे चित्र आहे.संशयित २४ वर्षीय रुग्णाने १२ ते २८ फेब्रुवारीदरम्यान उझबेकिस्तान व कझिकस्तान येथून प्रवास केला होता. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला व अंगदुखी असल्याने कोरोना विषाणू संशयित म्हणून मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये भरती करण्यात आले. त्याचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल येताच पुन्हा एकदा आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तज्ज्ञांच्या मते, नागरिकांनी खबरदारी घेतल्यास, प्रतिबंधक उपाय केल्यास हा आजार दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.दुबईमधून आलेला रुग्ण संशयितदुबई येथून प्रवास करून आलेला एक पुरुष रुग्णाला दोन-तीन दिवसांपासून ताप, सर्दी व खोकला आदी लक्षणे आहेत. त्याने याची माहिती मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिली आहे. त्याला भरती होण्यास सांगण्यात आले आहे. परंतु त्याने तूर्तास नकार दिला आहे. आरोग्य विभाग त्यांच्याशी संपर्क साधून असल्याचे सांगण्यात येते.विमानतळावर प्रवाशांची ‘थर्मल स्कॅनिंग’कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. मुंबई, पुणेपाठोपाठ नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारपासून प्रवाशांची ‘थर्मल स्कॅनिंग’ सुरू करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांची एक चमू तैनात आहे. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत दोहा आणि शारजाह येथून आलेल्या २६४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यातील एकही रुग्ण संशयित आढळून आलेला नाही.

टॅग्स :corona virusकोरोनाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर