शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खासगी रुग्णालयात कोरोनावर सरकारी दराने उपचार व्हावेत : हायकोर्टाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:42 IST

खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा व उपचार दर महागडे आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेता खासगी रुग्णालयांमध्येही सरकारी दराने उपचार उपलब्ध होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी मांडली.

ठळक मुद्देसरकारला केल्या विविध महत्त्वपूर्ण सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा व उपचार दर महागडे आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेऊ शकत नाहीत. ही बाब लक्षात घेता खासगी रुग्णालयांमध्येही सरकारी दराने उपचार उपलब्ध होणे आवश्यक आहे, अशी भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी मांडली. तसेच, ही भूमिका प्रत्यक्षात उतरण्यासाठी राज्य सरकारला विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या.कोरोना रुग्णांना पोटात खाण्यासाठी विविध वस्तूंची गरज असते. विविध वैद्यकीय उपकरणांद्वारे त्यांच्या तपासण्या कराव्या लागतात. तसेच, त्यांना इतरही अनेक सुविधांची गरज असते. राज्य सरकार पोटात खाण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, औषधे व आॅक्सिजन ठोकमध्ये किमान भावात खरेदी करू शकते. त्यानंतर या वस्तूंचा मागणीनुसार पुरवठा करता येईल. तसेच, विविध तपासण्यांकरिता विशिष्ट दर ठरवून मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळा आणि एमआरआय व सीटी स्कॅन सेंटरसोबत करार करता येऊ शकतात. त्यातून कोरोना उपचाराचा खर्च आपोआप कमी होईल. सर्वकाही पारदर्शीपणे व्हावे याकरिता या यंत्रणेवर विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अन्न व औषधे विभागाचे आयुक्त लक्ष ठेवू शकतात, असे उच्च न्यायालयाने सांगितले. तसेच, सरकारचे दर मान्य करणार नाही अशा प्रयोगशाळा आणि एमआरआय व सीटी स्कॅन सेंटरना कोरोना रुग्णांची तपासणी करता येणार नाही याकडे लक्ष वेधले.ग्रेटर मुंबईमध्ये महानगरपालिकेने जम्बो कोरोना रुग्णालय उभारले आहे. त्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर नि:शुल्क उपचार केले जात आहेत. अशी सुविधा नागपूरमध्ये का उपलब्ध होऊ शकत नाही, असा सवालही उच्च न्यायालयाने सरकारला विचारला.उपलब्ध रुग्णालयांतच सुविधा वाढवाशहरात उपलब्ध असलेल्या सरकारी व महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्येच सुविधा वाढवून कोरोना रुग्णांवर आवश्यक उपचार केले गेले पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये १००० खाटांचे जम्बो रुग्णालय तयार करणे प्रस्तावित आहे. परंतु, कोरोना संक्रमण संपल्यानंतर ही सुविधा कोणत्याच कामाची राहणार नाही. त्यामुळे अशा अस्थायी सुविधा तयार करण्याऐवजी एम्स, इंदिरा गांधी रुग्णालय, मेयो व मेडिकल या रुग्णालयांमध्येच वैद्यकीय सुविधा वाढविल्या गेल्या पाहिजे. या सुविधा पुढेही दीर्घकाळ वापरता येऊ शकतील असे न्यायालयाने स्पष्ट केले.आयएमए, रोटरीच्या प्रस्तावावर निर्णय घ्याइंडियन मेडिकल असोसिएशन व रोटरी क्लब यांनी नागपूर नागरिक सहकारी रुग्णालय आणि म्यूर मेमोरियल हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांवर उपचार व्हावे याकरिता प्रस्ताव सादर केले आहेत. राज्य सरकार व महानगरपालिका यांनी या प्रस्तावांवर गांभीर्याने विचार करावा आणि त्यावर २९ सप्टेंबरपर्यंत योग्य तो निर्णय घेऊन प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.इंदिरा गांधी रुग्णालयात कोणत्या सुविधा आहेतइंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी कोणत्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, या रुग्णालयासह मेयो व मेडिकल येथे कोरोना रुग्णांसाठी किती खाटा रिक्त आहेत याची विस्तृत माहिती सादर करावी, असा आदेशदेखील उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मनपाला दिला.समन्वय समितीमध्ये डॉ. अनुप मरारखासगी रुग्णालयांच्या अडचणी सोडविण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीमध्ये डॉ. अनुप मरार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. ते विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतील. या समितीच्या बैठक इतिवृत्तामध्ये काहीच गोपनीय नाही. त्यामुळे बैठकीचे इतिवृत्त सर्व पक्षकारांना उपलब्ध करून द्यावे, असे उच्च न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या