शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 09:57 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी जे तिसरे कोविड सवलत पॅकेज जाहीर केले आहे ते पाहून शेवटी कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देहळद, मखाना, तीळ, करडी अशा पिकांवर संस्करण करण्यासाठी १० हजार कोटींचा फंड

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी जे तिसरे कोविड सवलत पॅकेज जाहीर केले आहे ते पाहून शेवटी कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.याचे कारण असे की सीतारामन यांनी आज ज्या ११ उपाययोजना घोषित केल्या, त्या भारतातील शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून मागणी करीत होते. सरकारने कृषी उत्पादनाचा वाढीव दर ४ टक्क्यांवर नेण्याच्या घोषणा अनेकदा केल्या पण या छोट्या मागण्यांकडे मात्र कधीच लक्ष दिले नाही. आज त्यातील काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्याचे श्रेय कोरोनालाच द्यायला हवे. आज ज्या आठ घोषणा झाल्या त्यात १ लाख कोटी कोल्ड चेन, कृषी उत्पादनाची साठवणूक, कृषी माल प्रसंस्करण यासाठी आहेत. याशिवाय हळद, मखाना, तीळ, करडी अशा पिकांवर संस्करण करण्यासाठी १० हजार कोटींचा फंड, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांसाठी बोटी घेण्यासाठी २० हजार कोटी, गायी, म्हशी, शेळ्या यांना लस देण्यासाठी १३,५०० कोटी, डेअरी उद्योगासाठी १५ हजार कोटी, औषधी वनस्पतीच्या संगोपनासाठी ४००० कोटी एवढेच नव्हे तर मधमाशा पालनासाठी ५०० कोटी व कांदे-बटाट्यांना योग्य भाव मिळण्यासाठी वाहतूक व साठवणुकीत अनुदानासाठी ५०० कोटी असे प्रावधान आहेत. विशेष म्हणजे या सर्व सोयी शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागितल्या आहेत, हे सर्वांनाच विदित आहे. याचबरोबर कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळण्यासाठी जिल्हाबंदी व निर्यातबंदी साठवणूक मर्यादा हटवा, या मागण्याही आता सरकारने मान्य केल्या आहेत व त्यासाठी आवश्यक वस्तू अधिनियमात (इसेन्शियल कमोडिटीज अ‍ॅक्ट) सुधारणा होणार आहे व एक नवीन कायदाही येणार आहे. सर्वात महत्त्वााचे म्हणजे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांपूर्वी कुठले कृषी उत्पादन किती क्षेत्रात पेरणी होणार आहे, किती उत्पादन अपेक्षित आहे, पर्जन्यमान कसे राहील व कृषी मालाचे भाव काय राहतील या विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. त्यांना कुठले पीक घ्यावे हे सोपे जाणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या खूप जुन्या मागण्या अशाप्रकारे मान्य झाल्या आहेत, ही समाधानाची बाब मानायला हवी.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी