शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Nagpur; कोरोनामुळे सहा जिल्हा परिषदांची निवडणूक दोन महिन्यांकरिता स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 08:43 IST

Coronavirus in Nagpur कोरोना संक्रमण वेगात वाढत असल्यामुळे राज्यातील नागपूर, वाशिम, अकोला, नंदुरबार, धुळे व पालघर या सहा जिल्हा परिषदांची निवडणूक दोन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे़ सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारचा यासंदर्भातील अर्ज मंजूर केला़

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाची परवानगी राज्य सरकारचा अर्ज मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना संक्रमण वेगात वाढत असल्यामुळे राज्यातील नागपूर, वाशिम, अकोला, नंदुरबार, धुळे व पालघर या सहा जिल्हा परिषदांची निवडणूक दोन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे़ सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारचा यासंदर्भातील अर्ज मंजूर केला़

अर्जावर न्यायमूर्तीद्वय ए़ एम़ खानविलकर व हृषिकेश रॉय यांच्यासमक्ष सुनावणी झाली़ कोरोना संक्रमणामुळे सदर सहा जिल्हा परिषदांची निवडणूक घेणे धोकादायक ठरेल़ निवडणूक घेतल्यास कोरोना संक्रमण आणखी वाढेल़ करिता, निवडणूक पुढे ढकलण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली़ महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानेही या भूमिकेचे समर्थन केले व निवडणूक दोन महिन्यांकरिता स्थगित करणे योग्य होईल, असे स्पष्ट केले, तसेच त्यानंतर निवडणूक घेण्याविषयी आवश्यक निर्णय घेतला जाऊ शकतो, याकडे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने हे मुद्दे विचारात घेता निवडणूक पुढे ढकलण्यास हिरवी झेंडी दाखवली़

४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विकास गवळी यांच्यासह इतरांच्या याचिका निकाली काढताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर जायला नको, असा निर्णय दिला, तसेच या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांत बसविण्याचे निर्देश दिले. या निर्णयाचे पालन करण्यासाठी सदर सहा जिल्हा परिषदांमध्ये नव्याने ओबीसी आरक्षण निश्चित करून संबंधित जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस