लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे पतीनंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या तहसील कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्यांना (एसडीओ) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, उद्या शुक्रवारी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.काही दिवसांपूर्वीच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. यात त्यांचा अहवाल रिअॅक्टिव्हेट दर्शविण्यात आल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार एसडीओने गेल्या काही दिवसात विविध ठिकाणी बैठकी घेतल्या. आमदार निवासात पाहणी केली. अनेकांच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वत:ची कोरोना टेस्ट करून घेतली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
नागपूरच्या तहसील कार्यालयातही आता कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 22:15 IST
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे पतीनंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या तहसील कार्यालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील उपविभागीय दर्जाच्या अधिकाऱ्यांना (एसडीओ) कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
नागपूरच्या तहसील कार्यालयातही आता कोरोना
ठळक मुद्देएसडीओ पॉझिटिव्ह : नुकतीच झाली अँटिबॉडी चाचणी